Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पाय अडखळून पडले अन्...पाहा व्हायरल व्हिडिओ | पुढारी

Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पाय अडखळून पडले अन्...पाहा व्हायरल व्हिडिओ

पुढारी ऑनलाइन डेस्क : Joe Biden : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी कोलोरॅडो येथील यूएस एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात पाय अडखळून पडले. पडल्यानंतर लगेचच ते पटकन उठून उभे राहिले आणि आपल्या स्थानावर गेले. दरम्यान, त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी कोलोरॅडोमधील यूएस एअर फोर्स अकादमीमध्ये पदवीदान समारंभात गेले. वास्तविक, प्रमाणपत्र दिल्यानंतर बायडेन पुढे सरकताच त्यांचे पाय वाळूच्या पोत्यात अडकले आणि ते पडले. तथापि, पडल्यानंतर लगेचच त्यांना हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी तसेच त्यांच्या यूएस सीक्रेट सर्व्हिसच्या दोन सदस्यांनी उचलले. ते पटकन उठले आणि त्यांच्या जागेवर परत गेले. पण, बायडेन पडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

Joe Biden : बायडेन ठीक आहेत; व्हाईट हाऊसने सांगितले

दरम्यान, या घटनेनंतर व्हाईट हाऊसने सांगितले की अध्यक्ष जो बायडेन पडल्यानंतर ते बरे आहेत. अकादमीच्या पदवीधरांना संबोधित करत असलेल्या व्यासपीठावरून परत येत असताना ते अडखळले. त्यांनी शेकडो कॅडेट्सचे अभिनंदन करून प्रमाणपत्रांचे वाटप केले. व्हाईट हाऊसचे कम्युनिकेशन डायरेक्टर बेन लॅबोल्ट यांनी ट्विट केले की बायडेन पूर्णपणे ठीक आहे. हस्तांदोलन करत असतानाच ते वाळूच्या पिशवीला धडकले आणि स्टेजवर पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, बायडेन ज्या प्लॅटफॉर्मवर उभा होते, त्या प्लॅटफॉर्मजवळ वाळूने भरलेल्या पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पडलेल्या स्थितीतून सावरल्यानंतर, अध्यक्ष कोणत्याही मदतीशिवाय आपल्या जागेवर परत गेले आणि समारंभाच्या वेळी ते उत्साही दिसले.Joe Biden

हे ही वाचा :

शिवराज्याभिषेक : सुराज्य निर्माण करणारा कल्याणकारी सोहळा

Singapore Tourist Destination : सफर नयनरम्य आणि गगनचुंबी इमारतींच्या सिंगापूरची

Back to top button