जळगाव : जबरी चोरीसह १९ गुन्ह्यांचा उलगडा, दोन आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या जाळ्यात | पुढारी

जळगाव : जबरी चोरीसह १९ गुन्ह्यांचा उलगडा, दोन आरोपी रामानंद नगर पोलीसांच्या जाळ्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीत वेळावेळी घडणाऱ्या चैन स्नॅचिंगचे गुन्हयातील आरोपीस पोलिसांनी अटक केली. यातून तब्बल १९ जबरी चोरी व चोरीचे गुन्हे उघकीस आणण्यात रामानंदनगर पोलीसांना यश मिळाले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जबरी चोरीचे गुन्हे करीत असलेला आरोपी दत्तात्रय अमृत बागुल (३९) व सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (२५) यांना रामानंद नगर पोलीसांनी ताब्यात घेवून तपास केला. आरोपी दत्तात्रय बागुल याने सन २०१८ ते २०२३ पर्यंत रामानंदनगर, जिल्हापेठ व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत एकूण १९ जबरी चोरीचे गुन्हे केले असून १४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात एकूण २६ तोळे सोने व गुन्हयात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
यांच्या पथकाने केली कारवाई…
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांचे मार्गदर्शनाखाली रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी पोलीस पथकाची नेमणुक केली. गुन्हयाचे तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक रोहीदास गभाले हे संजय सपकाळे, सुशिल चौधरी, पोलीस नाईक रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, विजय खैरे, प्रविण वाघ, राजेश चव्हाण, अतुल चौधरी, पोलीस शिपाई उमेश पवार, अनिल सोननी, दिपक वंजारी आदींनी कारवाई केली आहे.

हेही वाचा:

Back to top button