धुळे तालुक्यातील उभंड शिवारात युवकाची गोळ्या झाडून हत्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा
धुळे तालुक्यातील उभंड ते पिंपरखेड रस्त्यावर तरुणावर धारदार शस्त्राने वार करून तसेच गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे.
धुळे शहरातील साक्री रोडवर राहणारे यशवंत बागुल या तरुणाचे उभंड परिसरात शेत होते. रात्री उशिरा तो शेतावरून घराकडे परत येत असताना त्याला उभंड बारी जवळ अज्ञात व्यक्तींनी अडवले. यानंतर त्यांच्याशी वाद घालून त्यांच्या दिशेने गोळ्या झाडल्या. तर त्यांच्या गळ्यावर धारदार शास्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळाल्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामराव सोमवंशी तसेच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
घटनास्थळी पोलीस पथकांना गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेले मॅक्झिन तसेच वापरलेल्या गोळीच्या पुंगळ्या आढळून आल्या आहे. प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला असून मयत बागुल यांच्या समवेत असलेल्या युवकाची कसून चौकशी केली जात आहे.
हेही वाचा :
- पुणे : अखेर गदिमा स्मारकाच्या कामास मुहूर्त
- नाशिक : कुसमाडी वनबंधार्याचा उद्या स्वप्नपूर्ती सोहळा
- पुणे : बोपोडीत 63 घरे पालिकेकडून जमीनदोस्त