रायगड : किरकोळ कारणावरून मोहोत गोळीबार; दोघेजण गंभीर जखमी, महाड तालुक्यातील घटना | पुढारी

रायगड : किरकोळ कारणावरून मोहोत गोळीबार; दोघेजण गंभीर जखमी, महाड तालुक्यातील घटना

महाड; पुढारी वृत्तसेवा : महाड तालुक्यातील मोहोत येथे किरकोळ वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोघेजण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. सोहम आत्माराम हिरडेकर (वय 23) रा. भीवघर व संकेश शशिकांत कदम (वय 28) रा. भीवघर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. रोशन राम मोरे रा. मोहोत पाटीलवाडी असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक बंदूक देखील पोलिसांनी हस्तगत केली आहे.

महाड तालुक्यातील मोहोत येथे मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे करीत आहेत. जखमींना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता दाखर करण्यात आले होते. यातील एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला पुढील उपचाराकरिता मुंबई येथे पाठविण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button