Karnataka Elections : काँग्रेसचं पुन्हा ईव्हीएम वापरावर प्रश्नचिन्ह; निवडणूक आयोगाने मागितले पुरावे | पुढारी

Karnataka Elections : काँग्रेसचं पुन्हा ईव्हीएम वापरावर प्रश्नचिन्ह; निवडणूक आयोगाने मागितले पुरावे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक निवडणुकीत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे काँग्रेसला महागात पडले आहे. कर्नाटकात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळून लावत निवडणूक आयोगाने या सर्व ईव्हीएमचा प्रथमच वापर करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.

काँग्रेसचे आरोप चुकीचे

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत वापरल्या जात असलेल्या ईव्हीएमचा वापर यापुर्वीच दक्षिण आफ्रिकेत झाला आहे, असा दावा काँग्रेसने केला होता. निवडणूक आयोगाने मात्र काँग्रेसचे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने या गंभीर आरोपांचे पुरावे सादर करावेत, जेणेकरून त्याच्यावर कारवाई करता येईल. कर्नाटकमध्ये फक्त नवीन ईसीआयएल निर्मित ईव्हीएम वापरले आहे, याची माहिती काँग्रेसला आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

सुरजेवाला यांना लिहिले होते पत्र

निवडणूक आयोगाने यापूर्वी काँग्रेस नेते सुरजेवाला यांना पत्र लिहिले होते की, कर्नाटक निवडणुकीत वापरलेले ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने तयार केले आहेत. त्यांचा दक्षिण आफ्रिकेत यापूर्वी वापर केलेला नाही.

उद्या कर्नाटकचा निकाल

१० मे रोजी झालेल्या कर्नाटक निवडणुकीचा निकाल शनिवारी लागणार आहे. दरम्यान, काँग्रेसने ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत, पण राज्यात आपले सरकार स्थापन करण्याचा दावाही केला आहे. विविध वृत्तवाहिन्यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळत आहे.

हेही वाचा :

Back to top button