‘अब तेरा क्या होगा संजय राऊत’ : नितेश राणेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र | पुढारी

'अब तेरा क्या होगा संजय राऊत' : नितेश राणेंचे ठाकरे गटावर टीकास्त्र

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यातील सरकार अजून भक्कम झालंय. पत्राचाळीतील मराठी माणसांचा शाप खासदार संजय राऊत यांना लागणार आहे. राऊत यांचे पुन्हा जेलमध्ये जाण्याचे दिवस आलेत. नैतिकतेची भाषा राऊत यांनी करू नये. अब तेरा क्या होगा संजय राऊत,” अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली.

आधीचे मुख्यमंत्री जपून राहिले नाहीत : राज ठाकरे

राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने गुरूवारी दिलेला निकाल संभ्रमात टाकणार आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचे काय होणार ? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी २०२४ च्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आज (दि. १२) मीरा भाईंदर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा : 

Back to top button