Uddhav Thackeray : विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ - उद्धव ठाकरे | पुढारी

Uddhav Thackeray : विधानसभा अध्यक्षांनी चुकीचा निर्णय दिला तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ - उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाइन डेस्क : Uddhav Thackeray : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेणे विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, असे म्हटले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्षांनी आता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे. विधानसभा अध्यक्षांनी जर चुकीचा निर्णय दिला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. Uddhav Thackeray

पत्रकार परिषदेत, उद्धव ठाकरे यांनी हे ही म्हटले आहे की ते विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गट पत्र लिहिणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तातडीने निर्णय घ्यावा, असे म्हटले आहे.

Uddhav Thackeray : …अन्यथा राज्यपाल हे पद बरखास्त करायला हवे

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर अनेक ताशेरे ओढले. राज्यपाल हे थेट राजकारण खेळले. असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अशा राज्यपालांना शिक्षा व्हायला हवी. कारण राज्यपाल पदाची शपद घेताना ते संविधानावर हात ठेवून शपथ घेतात. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना त्यांच्या कृतींबद्दल शिक्षा व्हायला हवी, अन्यथा भविष्यात पुन्हा आणखी कोणत्याही राज्यात घडू शकते, असे म्हटले आहे. तसेच राज्यपालांच्या नियुक्तीसाठी नियमावली असावी अन्यथा राज्यपाल हे पदच बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच त्यांनी दिल्लीचे केजरीवाल सरकार आणि केंद्र सरकार या प्रकरणात देखील सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. याचा देखील उल्लेख केला.

…म्हणून मी राजीनामा दिला

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालाची भूमिका आणि शिंदे गटाच्या अन्य दाव्यांवर ताशेरे ओढले. ते चुकीचे आहे असे म्हटले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला, त्यामुळे त्यांचे सरकार पुनर्स्थापित करता येणार नाही. परिणामी शिंदे-फडणवीस सरकार बचावले. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, विश्वासघातक्यांच्या सर्टिफिकेटवर मला मुख्यमंत्री राहायचे नव्हते. म्हणून मी राजीनामा दिला. मी माझ्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला. मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे. Uddhav Thackeray

याशिवाय उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत आत्ताचं सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. न्यायालयाने सत्ताधाऱ्यांचा खोटा चेहरा उघडा पाडला आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे शिंदे -फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असा पुनरुच्चार केला. तसेच या डबल इंजिन सरकारमधील एक इंजिन पोकळ आहे, ते आपण बाहेर काढणारचं, असं त्यांनी म्हटले आहे. Uddhav Thackeray

हे ही वाचा :

सत्ता संघर्ष : जिंकूनही का हरले उद्धव ठाकरे? ५ पैकी ४ दावे शिंदे गटाविरोधात | (Thackeray Vs Shinde)

नितीशकुमारांनी घेतली शरद पवारांसह उद्धव ठाकरेंची भेट, विराेधी पक्षांना एकजुटीचे आवाहन

Back to top button