Adani-Hindenburg report : अदानी संदर्भातील तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणीची शक्यता | पुढारी

Adani-Hindenburg report : अदानी संदर्भातील तज्ज्ञ समितीचा अहवाल सादर; सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणीची शक्यता

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अदानी आणि अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणात तज्ज्ञ समितीने त्यांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी न्यायालयाने सहा सदस्यीय समितीची नेमणूक केली होती. पाकिटबंद लिफाफ्यात हा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आल्याचे कळतेय. दरम्यान समितीकडून सादर करण्यात आलेला अहवाल अंतिम असून तज्ज्ञ समितीने आणखी वेळ मागून घेतला आहे का, हे अद्याप स्पष्ट होवू शकलेले नाही.

शुक्रवारी,१२ मे ला याप्रकरणावर सुनावणीची शक्यता आहे. सेबीने नियुक्त केलेल्या समितीने यापूर्वी अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडून वेळ मागितला होता. सेबीचे पॅनेल आणि सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने २ मार्चला दिले होते. पंरतु, सेबीने अदानी समुहाशी संबंधीत तपासासाठी सहा महिन्यांचा अतिरिक्त वेळ मागितला होता. सेबीला २ मे रोजीच स्थितीदर्शक अहवाल सादर करायचा होता. पंरतु, यासाठी मुदत वाढवून देण्यासाठी सेबीने अर्ज दाखल केला होता. अशात शुक्रवारच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

Back to top button