Poha Cutlet Recipe : शिरा-पोहे खाऊन कंटाळलात? तर मग सोपे 'पोहा कटलेट' बनवा ना!

पुढारी ऑनलाईन डेस्क : रोज शिरा, उपीट, पोहे खाऊन तुम्हाला कंटाळा आलाय का? (Poha Cutlet Recipe) रोज नाश्त्याला काय बनवायचं हे प्रत्येक गृहिणीला पडलेला प्रश्न असतो. आम्ही येते तुम्हाला पोह्यांच्या एका खास पदार्थांची रेसिपी सांगणार आहोत. नुसता पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर पोह्यांपासून हा वेगळा पदार्थ तयार करून पहा. हा चटपटीत पदार्थ घरातल्या मंडळींना नक्कीच आवडेल. (Poha Cutlet Recipe)
साहित्य :
मैदा किंवा गव्हाचे पीठ
पोहे -एक कप
बटाटे- २ उकडलेले
मोहरी-अर्धा चमचा
हळद – अर्धा चमचा
साखर – चवीपुरता
मीठ -चवीपुता
तेल -सोयीनुसार
तूप – १ चमचा
कांदा – १ बारीक चिरलेला
लाल मिरची पावडर – अर्धा चमचा
हिरवी मिरची – २ बारीक कापलेल्या
कडीपत्ता – ४-५ पाने
आमचूर पावडर – चवीसाठी
कोथिंबीर
काजू-५
लिंबाचा रस
कृती –
प्रथम पोहे धुवून त्यातील पाणी काढून घ्या. ते एका वाटीत घेऊन बाजूला ठेवून द्या. आता मंद आचेवर पॅन ठेवा. पॅन गरम झाल्यानंतर त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, कडीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, मैदा फ्राय करून घ्या . एका मोठ्या बाऊलमध्ये हे मिश्रण बाजूला थंड होऊ द्या. थंड झालेल्या मिश्रणात लाल मिरची पावडर, हळद, कापलेली हिरवी मिरची एकत्र करा.
आता या मिश्रणात पोहे टाका, त्यात काजू लिंबाचा रस, साखर, मीठ, आमचूर पावडर, हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यानंतर त्यात उकडलेले बटाटे कुसकरून मळून घ्या. आता एका पोळपाटावर तुपाचा हात घेऊन मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याला कटलेटचा आकार द्या.
आता एका कढईमध्ये तेल चांगले गरम होऊ द्या. हे कटलेट तेलात परतून घ्या. गोल्डन कककलर येऊपर्यंत कटलेट दोन्ही बाजूंनी चांगले तळा.
तळलेले कटलेट तुम्ही टिश्यू पेपर काढू शकता. यामुळे अधिकचे तेल टिश्यू पेपमध्ये शोषले जाईल. गरमागरम पोह्यांचे कटलेट खायला तयार आहे. टोमॅटो सॉस, चटणी किंवा पुदिना, खोबऱ्याच्या चटणीसोबत तुम्ही हे पोह्यांचे कटलेट खाऊ शकता.
- Masala Papdi : चहासोबत स्नॅक म्हणून बनवा खुसखुशीत तिखट मसाला पापडी
- Upvasacha MeduVada : संकष्टीला खिचडी खावून कंटाळलाय; बनवा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा
- Benefits Of Papaya peel : पपईच्या साली फेकून देऊ नका, चेहरा चमकणारचं; असा करा उपयोग