Kerala High Court : केरळमध्ये प्रवासी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत ‘बोट-मालकावर’ खुनाचा गुन्हा दाखल | पुढारी

Kerala High Court : केरळमध्ये प्रवासी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 'बोट-मालकावर' खुनाचा गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात पर्यटकांची बोट उलटून 22 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी (दि.०७) संध्याकाळी घडली. याप्रकरणी बोट मालकावर (Kerala High Court) भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे, वृत्त एएनआयने दिले आहे.

याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर केरळ उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने तनूरमधील बोट दुर्घटनेने 22 जणांचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त केली आहे. याप्रकरणी केरळ उच्च न्यायालयाने मलप्पुरमच्या जिल्हाधिकार्‍यांना १२ मेपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. बोटीच्या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कारवाई न केल्याबद्दल देखील न्यायालयाने (Kerala High Court) राज्य सरकारला फटकारले आहे. तसेच रजिस्ट्रीला सार्वजनिक हितासाठी स्व-मोटो रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने (Kerala High Court) या क्षेत्राच्या प्रभारी बंदर अधिकाऱ्याकडून तपशील मागवला असल्याची माहिती देखील एएनआय ने वृत्तात दिली आहे.

हेही वाचा:

Back to top button