Road Accident : वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; ५ ठार, १७ जखमी | पुढारी

Road Accident : वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात; ५ ठार, १७ जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. शनिवारी (६ मे) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला.  वऱ्हाडाची बस आणि अज्ञात वाहनाची धडक झाली. या धडकेत वऱ्हाडाची बस पलटी झाली. हा अपघात एवढा भीषण होता की,   पाचजण जागीच ठार झाले आहेत. तर सतरा जखमी झाले आहेत. (Road Accident)

Road Accident : ५ ठार, १७ जखमी 

पोलिसांच्या माहितीनूसार उत्तरप्रदेशमधील जालौन जिल्ह्यातील गोपालपुराजवळ  वऱ्हाडाची बस आणि अज्ञात वाहनाची धडक झाली आहे.  वऱ्हाडाची  बस मडैला गावातून दुतावली गावात आली होती. येथे लग्नाचे विधी आटोपल्यानंतर ही बस लोकांना घेऊन मडैला गावाकडे निघाली होती. यात बस उलटल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर सतराजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास घडली.   माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना बाहेर काढून सीएचसी मधौगडमध्ये उपचारांसाठी पाठवले. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा

Back to top button