Congo Floods : कांगोतील महापुरात २०० ठार; हजारो घरांची पडझड, शेकडो वाहून गेले
किन्शासा; वृत्तसंस्था : कांगो या आफ्रिकेतील देशात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात हजारो घरांची पडझड झाली असून, 200 वर लोक मरण पावले आहेत. (Congo Floods)
कालेहे येथील सहायक प्रशासक आर्किमिडी करहेबवा यांनी त्याला दुजोरा दिला आहे. दक्षिण किवू प्रांत महापुरामुळे सैरभैर झाला आहे. किवू प्रांतालगतच्या रवांडातही डझनोगणती लोकांचा मृत्यू झाला आहे. कालेहेलगतचे किवू सरोवर आणि रवांडाला लागून असलेल्या सीमेलगतचे अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. नद्यांनी आपले काठ ओलांडून लगतची गावेच्या गावे कवेत घेतल्याने साराच भाग जलमय झालेला आहे. विशेष म्हणजे काठापासून उंचावर असलेल्या गावांनाही पुराचा फटका बसला. (Congo Floods)
एकाच कुटुंबातील 11 मुलांचा मृत्यू
संततधार आणि मुसळधार पावसामुळे ही परिस्थिती ओढविली, असे मुपेंडा नावाच्या युवकाने सांगितले. मुपेंडा याची आई तसेच त्यांच्या कुटुंबातील 11 मुलांचा महापुरात मृत्यू झाला आहे.
अधिक वाचा :

