Japan Earthquake : जपानला ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा नाही | पुढारी

Japan Earthquake : जपानला ६.३ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का, त्सुनामीचा इशारा नाही

पुढारी ऑनलाईन : मध्य जपानमध्ये शुक्रवारी (दि.०५) ६.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. जपानमध्ये भूकंप झाल्यानंतर त्सुनामीचा धोका वाढतो. परंतु याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या त्सुनामीचा इशारा (Japan Earthquake) देण्यात आला नाही. अशी माहिती जपानच्या हवामान संस्थेने सांगितल्याचे वृत्त एएफपी न्यूज एजन्सीने दिले आहे.

या भूकंपानंतर (Japan Earthquake) जपान रेल्वेने जपानमधील नागानो आणि कानाझावा या लोकप्रिय पर्यटन स्थळादरम्यान शिंकानसेन बुलेट ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती येथील रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवली आहे.

हेही वाचा:

Back to top button