जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्विट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल | पुढारी

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्विट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अश्लील ट्विट करणाऱ्या एकावर राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय नावाच्या एका ट्विटर हँडलरवरून आमदार आव्हाड यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणारी पोस्ट शेअर करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे उथळसर ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे आणि सोशल मीडियाचे प्रमुख जतीन कोठारी यांनी राबोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास राबोडी पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button