डी. एस. कुलकर्णी यांच्या ईडीने सील केलेल्या बंगल्यात चोरी

डी. एस. कुलकर्णी यांच्या ईडीने सील केलेल्या बंगल्यात चोरी
Published on
Updated on

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या डी. एस. कुलकर्णी यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७, रा. मार्बल आर्च सोसायटी, गणेशखिंड रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीचा हा प्रकार १६ ऑक्टोबर २०१९ ते ११ ऑक्टोबर, २०२१ दरम्यान घडला आहे. गुंतवणुकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या ४ वर्षांपासून बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी हे तुरूंगात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डी. एस. कुलकर्णी यांचा सेनापती बापट रोडवरील चतु:श्रृंगी मंदिराच्या जवळ सप्तशृंगी नावाचा बंगला आहे. डीएसके यांच्यासह कुटुंबावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा बंगला जप्त केल्याने तो बंद होता.

बंगल्याच्या दरवाजाचे लॉक व सील तोडून चोरट्याने बंगल्यामधील ८ एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर, ३ सीडी प्लेअर, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, देवघरातील चांदी, कॅमेरा, गिझर, पिठाची गिरणी असा एकूण ६ लाख, ९५ हजार रुपयांचा माल चोरुन नेला,' असे भाग्यश्री कुलकर्णी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

बंगल्यासाठी नातवाच्या नावे कोर्टात अर्ज

गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुलकर्णी यांचा जप्त केलेला सप्तश्रृंगी हा बंगला वगळावा, अशी मागणी अर्जाद्वारे न्यायालयात करण्यात आली आहे. डीएसके यांच्या सहा वर्षांच्या नातवाच्या वतीने हा अर्ज करण्यात आला होता. डी. एस. कुलकर्णी यांनी चतु:श्रृंगी परिसरात १९९६ मध्ये बंगल्याची जागा विकत घेतली होती. तेथे त्यांनी २००६ मध्ये ४० हजार चौरस फुट बांधकाम करत अलिशान बंगला बांधला. जुन्या पद्धतीने बांधलेला हा बंगला वैशिष्टपूर्ण आहे. डीएसके यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यात या बंगल्याचाही समावेश होता. या जप्तीवर कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला होता. हा बंगला बक्षीसपत्र करून नातू दक्ष कुलकर्णी याच्या नावावर केल्याने तो जप्तीतून वगळावा अशी विनंती कोर्टाला केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news