नाशिक : घाटमाथ्यावरील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार कांदेकडून पहाणी | पुढारी

नाशिक : घाटमाथ्यावरील नुकसानग्रस्त शेतपिकांची आमदार कांदेकडून पहाणी

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील घाटमाथा परिसरावरातील आवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतपिकाची आमदार सुहास कांदे यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी पाहणी करत १०० टक्के शेतीपिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे आश्वासन आमदार कांदे यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

रविवारी (दि.9) घाटमाथ्यावरील झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवार (दि.12) आमदार सुहास कांदे हे थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून दोन दिवसात परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे १०० टक्के पंचनामे करण्याचे आदेश प्रशासकीय यंत्रणेला दिले. यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची संख्या त्वरित वाढविण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देखील आमदार यांनी केल्या. आमदार कांदे यांनी बोलठाण, जवळकी, जातेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे पाहून आमदार भावुक झाले. वर्षभर पोटच्या मुलासारखे पीक जपून नैसर्गिक आपत्तीने क्षणात नाहीसे होणे अतिशय वेदनादायी आहे. मी सुध्दा शेतकऱ्याचा मुलगा असल्याने मला याची पूर्णत: जाणीव आहे. त्यामुळे धीर सोडू नका आमदार व सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. लवकरात लवकर आपल्याला ही झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. असे आश्वासन यावेळी आमदार सुहास कांदे यांनी दिले. पाहणी प्रसंगी तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे सर्व कर्मचारी, सरपंच वाल्मीक गायकवाड, अनिल रिंढे, रफिक पठाण, गोकुळ कोठारी, गुलाब चव्हाण, मनोज रिंढे, अनिल सोनवणे, गणेश व्यवहारे, संदीप सूर्यवंशी,भाऊसाहेब सूर्यवंशी,बंडू पाटील,गूलाब पाटील,संतोष गायकवाड,शरद पवार,सुभाष पवार,भरत गायकवाड,नाना थोरात,अंकूश पगारे,मारुती सोनवणे,रमेश पाटील, ग्रामविकास अधिकारी भगवान जाधव यांच्या सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button