मस्क आणि वोझनाइक म्हणतात ‘AI’ वर बंदी आणा, जाणून घ्या कारण | पुढारी

मस्क आणि वोझनाइक म्हणतात 'AI' वर बंदी आणा, जाणून घ्या कारण

पुढारी ऑनलाइन डेस्क : AI म्हणजेच आर्टिफिशिअल इंटिलिजन्स विकसित करण्यावर तातडीने बंदी आणा, अशी मागणी टेस्ला प्रमुख एलॉन मस्क आणि अॅपलचे को फाउंडर स्टीव्ह व्होझनाईक यांनी केली आहे. सध्या जगात AI चे युग अवतरत आहेत. यामध्ये ChatGPT चे नुकतेच चौथे व्हर्जन लाँच झाले आहे. याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच ChatGpt मुळे भविष्यात कोट्यावधी लोक बेरोजगार होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. तर त्याचे अनेक फायदे आहेत, असेही अनेकांचे मत आहे. आता मस्क आणि अॅपलचे को फाउंडर यांनी यावर बंदी आणण्याची मागणी केल्यानंतर याला एक नवीन वळण मिळाले आहे.

काय म्हणाले मस्क?

एलॉन मस्क आणि अॅपलचे को फाउंडर यांनी स्टीव्ह व्होझनाईक म्हटले आहे की, AI विकसित करण्यावर बंदी आणायला हवी. कारण असे न झाल्यास AI संपूर्ण मानवतेचे शत्रू सिद्ध होऊ शकते. त्यांच्या मतानुसार AI आउट ऑफ कंट्रोल होऊ शकते.

काही काळापूर्वी कल्पना वाटणारे AI फक्त प्रत्यक्षातच उतरलेले नाही तर यामध्ये होत असलेली प्रगती पाहता अनेक नवीन प्रश्न, समस्या आणि भीती उत्त्पन्न झाली आहे. अनेकांच्या मते यामुळे कोट्यावधी लोकांना बेरोजगारीचा सामना करावा लागू शकतो. तर अनेक क्षेत्रात हे मोठ्या सहाय्यकाची भूमिका अदा करू शकते, असेही मानले जात आहे. तसेच नवीन क्षेत्रात यामुळे रोजगार निर्माण होऊ शकतात. मात्र AI चे तंत्रज्ञान भविष्यात मानवतेचे शत्रू ठरू शकतात, असेही मत अनेकांनी नोंदवले आहे.

काहींच्या मते यामुळे एक दिवस मशीन अंतर्गत मनुष्याला काम करावे लागेल. यामुळेच मस्क आणि स्टीव वोझनाइक यांनी फ्यूचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूटच्या बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. आहे. यावर 1000 टेक दिग्गज आणि रिसर्च्स यांनी देखील साइन इन केले आहे.

फ्यूचर ऑफ लाइफ इन्स्टिट्यूट

फ्यूचर ऑफ लाइफ इन्स्टिट्यूट ही केंब्रिज-आधारित एनजीओ आहे जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जबाबदार आणि नैतिक विकासासाठी मोहीम राबवते. यापूर्वी, धोकादायक स्वायत्त शस्त्र प्रणाली विकसित न करण्यासाठी संस्थेला मस्क आणि गुगलच्या एआय लॅब डीपमाइंडचा पाठिंबा मिळाला होता.

संस्थेचे म्हणणे आहे की ते सर्व एआय लॅबशी बोलत आहेत की जीपीटी-4 पेक्षा शक्तिशाली असलेल्या कोणत्याही एआय प्रणालीचे प्रशिक्षण त्वरित थांबवावे. ही बंदी किमान सहा महिन्यांसाठी असावी. या महिन्याच्या सुरुवातीला ओपन एआयने GPT-4 लाँच केले आहे, जे GPT-3 पेक्षा कितीतरी पटीने अधिक शक्तिशाली आहे.

काय लिहिले आहे या पत्रात ?

पत्रात लिहिले आहे की, ‘एआय प्रणाली आता सामान्य कामांमध्ये माणसांच्या बरोबरीची आहे. आम्ही स्वतःला विचारले पाहिजे की आम्ही मशीन्सना आमच्या माहिती चॅनेलला प्रचार आणि चुकीच्या माहितीने भरू द्यायचे का?

त्यांनी पत्रात लिहिले की, ‘आपण सर्व काम ऑटोमेशनवर टाकावे का? आपली जागा घेऊ शकेल असा मानवापेक्षा बुद्धीमान मेंदू आपण विकसित करावा का?’

तंत्रज्ञानाच्या दिग्गजांना का थांबायचे आहे?

एलॉन मस्क आणि इतर अनेक तंत्रज्ञान दिग्गजांना AI लॅबवर बंदी घालायची आहे. दिग्गजांचे असे मत आहे की मानवी बुद्धिमत्तेसारखा एआयचा विकास थांबविला पाहिजे. एलॉन मस्क, ऍपलचे सह-संस्थापक स्टीव्ह वोझनाईक आणि इतर दिग्गजांनी फ्यूचर ऑफ लाईफ इन्स्टिट्यूटच्या एका खुल्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे.

या पत्रात असे म्हटले आहे की AI लॅब्सना GPT-4 पेक्षा अधिक शक्तिशाली मॉड्यूल तयार करण्यापासून थांबवावे. GPT-4 हे ओपन एआय या अमेरिकन स्टार्टअपने विकसित केले आहे आणि मायक्रोसॉफ्टने निधी दिला आहे.

AI चे CEO केले जात आहे

मशिन्सच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू झाले आहे. NetDragon Websoft या चीनमधील गेमिंग कंपनीने AI-आधारित रोबोटला तिच्या उपकंपनीपैकी एकाचा CEO बनवले आहे. वकिलांपासून सल्लागारांपर्यंत एआय बनवले जात आहे.

काहींनी ChatGPT ला सीईओ बनवले आहे. उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे केले जात असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे. मात्र येथूनच यंत्रांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात होत आहे. त्याच वेळी, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांचा असा विश्वास आहे की मानवांइतकी बुद्धिमत्ता असलेले AI भविष्यात धोका बनू शकते.

हे ही वाचा :

Samantha Ruth Prabhu : ‘ऊ अंटावा’ गाण्यावर सामंथा म्हणाली, घरच्यांनी…

Black Hawk helicopters crash | अमेरिकेच्या आर्मीची दोन हेलिकॉप्टर्स एकमेकांना धडकली, अनेक जणांचा मृत्यू

Chat GPT : ‘चॅट जीपीटी’च्या मदतीने वाचवला कुत्र्याचा जीव!

Twitter : ट्विटरचा ‘सोर्स कोड’ लीक; एलन मस्क यांची चिंता वाढली

Back to top button