

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्यावर काँग्रेससोबत असणार्या मतभेदावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (दि. २९ ) आपली भूमिका स्पष्ट केले. संजय राऊत म्हणाले, "काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या घरी बोलावलेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीला आम्ही गेलो नव्हतो हे खर आहे. आमच्या नाराजीबाबत चर्चा झाली आहे. आम्ही महाराष्ट्रात आणि देशातही एकत्र राहु. आमचे जे काही मुद्दे होते ते आम्ही योग्य ठिकाणी पोहचवले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी चांगली भूमिका घेत आहे." (Sanjay Raut)
ऑपरेशनबाबत आम्हाला काय सांगू नका. आम्हाला मुका मार देता येतो. तुम्ही ऑपरेशन करत बसा. तुम्हाला मुका मार बसल्याशिवाय राहणार नाही. देशाला अनुभव आहे की, प्रत्येक भ्रष्टाचार करणाऱ्यांना डॉक्टरेट मिळते. खऱतर डॉक्टरेट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी व्हायला हवी. ज्यांच्यावर भ्रष्टाचार गैरव्यवहारांचे गुन्हे दाखल असलेल्यांना कशी काय ही पदवी मिळते, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधान केले होते की, ठाकरेंपेक्षा मी गर्दी जमवली आहे. या विधानावरुन राऊत यांनी सावंत यांच्यावर हल्लाबोल केला. अशा लोकांना घेवून मिंदे गट फिरत आहे. जे लोक बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करत आहेत. तानाजी सावंत यांनाही डॉक्टरेट दिली पाहिजे. असं म्हणत शिंगदे गटासह सावंत यांच्यावर निशाणा साधला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सरकार कोसळेल अस विधान जयंत पाटील यांनी केलं होते, या संदर्भात बोलत असतान राऊत म्हणाले, जयंत पाटील बरोबर बोलत आहेत.
हेही वाचा