Data Leak : भारतीय जवानांसह, व्हॉट्सॲप, फेसबुकच्या कोट्यावधी यूजर्सचा डेटा लिक; सात डेटा ब्रोकर्सना अटक | पुढारी

Data Leak : भारतीय जवानांसह, व्हॉट्सॲप, फेसबुकच्या कोट्यावधी यूजर्सचा डेटा लिक; सात डेटा ब्रोकर्सना अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : डेटाची चोरी, खरेदी आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी काल पर्दाफाश केला. भारतीय जवानांसह, व्हॉट्सॲप, फेसबुक यूजर्सचा डाटा लीक (Data Leak) केल्याप्रकरणी दिल्लीतून सात डेटा ब्रोकर्सना अटक करण्यात आली आहे.  चोरलेल्या डेटामध्ये लष्कराच्या जवानांचा डेटा, देशातील लोकांचे फोन नंबर, NEET विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आदींचा समावेश आहे.

आरोपी नोएडा येथील कॉल सेंटरद्वारे डेटा गोळा करत होते. हा चोरलेला डेटा 100 सायबर ठगांना विकल्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे. या मोठ्या सोशल मीडिया डेटा लीकचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या डेटा लीकमध्ये सरकारी आणि गैर-सरकारी खात्यांच्या सुमारे १६.८ कोटी व्हॉट्स अप, फेसबुक खात्यांचा डेटा  (Data Leak) आहे. त्यात २.५५ लाख लष्करी अधिकाऱ्यांचा सोशल मीडिया अकाउंट डेटाचा समावेश आहे. या संपूर्ण टोळीला तेलंगणा पोलिसांनी अटक केली आहे.

हे चोर १४० वेगवेगळ्या श्रेणींमध्ये डाटा विकत होते. यामध्ये लष्कराच्या जवानांचा डेटा, देशातील लोकांचे फोन नंबर, NEET विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती आदींचा समावेश आहे. सायबराबादचे पोलीस आयुक्त एम स्टीफन रवींद्र यांनी ही माहिती दिली. याप्रकरणी दिल्लीतून सात डेटा ब्रोकर्सना अटक करण्यात केली आहे. सर्व आरोपी नोएडा येथील कॉल सेंटरद्वारे डेटा गोळा करत होते. चोरलेला डेटा १०० सायबर ठगांना विकल्याचीही कबुली आरोपींनी दिली आहे.

या डेटा लीकमध्ये १२ दशलक्ष व्हॉट्सॲप यूजर्स आणि 1.7 दशलक्ष फेसबुक यूजर्सचा डेटा समाविष्ट आहे. लष्करी जवानांच्या डेटामध्ये त्यांची सध्याची रँक, ई-मेल आयडी, पोस्टिंगचे ठिकाण इत्यादींचा समावेश असतो. हा डेटा लष्कराच्या हेरगिरीसाठी वापरला जाऊ शकतो. पोलिसांच्या अहवालानुसार आरोपींनी 50 हजार लोकांचा डेटा अवघ्या 2 हजार रुपयांना विकला आहे. (Data Leak)

यापूर्वी नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत, अमेरिका, सौदी अरेबिया आणि इजिप्तसह ८४ देशांतील व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा लीक झाला होता आणि हा डेटा ऑनलाइन विकला गेला होता. जगभरातील सुमारे ४८७ दशलक्ष व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा हॅक करण्यात आला. हॅक केलेल्या डेटामध्ये 84 देशांतील व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे मोबाइल नंबर देखील समाविष्ट होते, त्यापैकी 61.62 लाख फोन नंबर भारतीयांचे होते.

हेही वाचा

Back to top button