Corona new Variant : इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन प्रकार | पुढारी

Corona new Variant : इस्रायलमध्ये आढळला कोरोनाचा नवीन प्रकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनासारख्या जागतिक महामारीने अख्ख्या जगाला हादरवून टाकलं आहे. आता जगभरात कोरोना विषाणूची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, इस्रायलमध्ये कोरोनाच्या नवीन प्रकाराची पुष्टी झाली आहे. इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे. हा नवीन प्रकार दोन लोकांमध्ये आढळून आला आहे. हा नवीन प्रकारचा विषाणू BA.1 (Omicron) आणि BA.2 प्रकारच्या एकत्रीकरणातून विकसित झाला आहे. इस्रायलच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, परदेशातून देशात परतलेल्या दोन लोकांमध्ये कोरोनाचे नवीन प्रकार आढळून आले आहेत. वाचा सविस्तर माहिती. (Corona new Variant)

इस्रायलमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार सापडला आहे. इस्रायलच्या स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, परदेशातून देशात परतलेल्या दोन लोकांमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आला आहे. या प्रकाराची लागण झालेले दोन प्रवासी बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले होते. पीसीआर चाचणीत दोघेही पॉझिटिव्ह आढळले. या दरम्यान, हा कोविडचा नवीन प्रकार असल्याची पुष्टी देखील झाली. अहवालानुसार, दोन्ही बाधित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या अहवालात मंत्रालयाच्या हवाल्याने म्हटले आहे की रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप आणि स्नायू दुखणे अशी लक्षणे आहेत.

हेही वाचा 

Back to top button