Australia : खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास केला बंद; हिंदूंविरोधी पोस्टर लावले | पुढारी

Australia : खलिस्तानी समर्थकांनी ब्रिस्बेनमधील भारतीय दूतावास केला बंद; हिंदूंविरोधी पोस्टर लावले

पुढारी ऑनलाईन डेस्क : खलिस्तान समर्थकांनी बुधवारी (दि.१५) ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासाचे मुख्य गेट जबरदस्तीने बंद केले. हे वाणिज्य दूतावास ब्रिस्बेनच्या तारिंगाच्या उपनगरी भागात आहे. ‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, खलिस्तान समर्थक झेंडे, पोस्टर आणि बॅनर घेऊन येथे पोहोचले. त्यांनी लोकांना वाणिज्य दूतावासात प्रवेश दिला नाही. त्यामुळे वाणिज्य दूतावासात काम होऊ शकले नाही. काही दिवसांपूर्वी खलिस्तानींनी ब्रिस्बेनमधील एका हिंदू मंदिरालाही लक्ष्य केले होते. मार्चच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली. ऑस्ट्रेलियातील हिंदूंना धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचे हिंदू मानवाधिकार संचालक सारा गेट्स यांनी म्हटले आहे. (Australia)

माहितीनूसार, हिंदू ह्युमन राइट्सच्या संचालक सारा एल गेट्स यांनी ऑस्ट्रेलिया टुडे या वृत्तसंस्थेला सांगितले की, खलिस्तान समर्थक ब्रिस्बेन शहरातील भारतीय वाणिज्य दूतावासाच्या मुख्य गेटवर झेंडे, पोस्टर आणि बॅनर घेऊन येथे पोहोचले. तेथे त्यांनी खलिस्तान जिंदाबादचे नारे दिले. लोकांना दुतावासात जाण्यास मज्जाव केला. सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वाणिज्य दूतावास बंद करणे भाग पडले. नुकतेच भारत दौऱ्यावर आलेले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियातील खलिस्तानी संघटनांनी निर्माण केलेल्या अशांततेबाबत चर्चा केली होती, ज्यामध्ये अल्बानीज यांनी शांतता राखण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते.

Australia : खलिस्तानींच्या निशाण्यावर भारतीय संस्था

ऑस्ट्रेलियातील भारतीय वाणिज्य दूतावास अर्चना सिंग यांना घटनास्थळी खलिस्तानी ध्वज सापडला. त्यांनी तत्काळ क्वीन्सलँड पोलिसांना माहिती दिली. अर्चना सिंह यांनी सांगितले की, आमचा पोलिस आणि अधिकाऱ्यांवर पूर्ण विश्वास आहे. आणखी एका पत्रकाराने सांगितले की, आतापर्यंत भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन लोकांवर हल्ले होत होते. आता खलिस्तानी समर्थक भारत सरकारशी संबंधित संस्थांनाही लक्ष्य करत आहेत.

हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी खलिस्तानींनी ब्रिस्बेनमधील एका हिंदू मंदिरालाही लक्ष्य केले होते. मार्चच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली होती. ऑस्ट्रेलियातील हिंदूंना धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचे हिंदू मानवाधिकार संचालक सारा गेट्स यांनी म्हटलं आहे. हल्ल्यानंतर हिंदू समाजाच्या सदस्यांनी मंदिराच्या भिंतींवरून हिंदुविरोधी घोषणा काढून टाकल्या. गेट्स यांनी त्याचा एक फोटो ट्विट करून हिंदुस्थान जिंदाबाद असे लिहिले आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला खलिस्तानी फुटीरतावाद्यांना लगाम घालण्यास सांगितले होते. ऑस्ट्रेलिया हे हल्ले गांभीर्याने घेत आहेत.

हेही वाचा

Back to top button