NASA: नासाच्या वेब टेलिस्कोपने टिपले ता-याचा मृत्यू होतानाचे अद्भूत छायाचित्र | पुढारी

NASA: नासाच्या वेब टेलिस्कोपने टिपले ता-याचा मृत्यू होतानाचे अद्भूत छायाचित्र

पुढारी ऑनलाइन डेस्क : नासाच्या वेब टेलिस्कोपने अवकाशातील अनेक अद्भूत दृश्ये टिपली आहेत. मात्र, एखाद्या ता-याचा मृत्यू होताना तो तारा कसा दिसतो याचे छायाचित्र घेणे हे अत्यंत दूर्मिळ असते. नासाच्या ‘द वेब स्पेस टेलीस्कोप’ ने यावेळी एका ता-याचा मृत्यू होतानाचे अद्भूत छायाचित्र टिपले आहे. नासाने हे छायाचित्र त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहे. (NASA)

NASA: सूर्यापेक्षा जवळपास 30 पटींनी अधिक मोठा

नासाने टिपलेल्या या छायाचित्रात ता-यातून धूळ आणि गॅस सारख्या गोष्टी दिसत आहे. या मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या ता-याचे नाव डब्ल्यूआर-124 आहे. हा तारा आपल्या सूर्यापेक्षा जवळपास 30 पटींनी अधिक मोठा होता.

प्रकल्पात सहभागी असलेल्या युरोपियन स्पेस एजन्सीच्या शास्त्रज्ञ मॅकेरेना गार्सिया मारिन म्हणाल्या, “आम्ही यापूर्वी असे कधीही पाहिले नव्हते. हे खरोखरच रोमांचक आहे.” ‘द वेब स्पेस टेलिस्कोप’ ची स्थापना 2021 च्या उत्तरार्धात करण्यात आली होती, त्यानंतर हे त्याचे पहिले निरीक्षण आहे.

हे ही वाचा :

Back to top button