जगातील टॉप १०० प्रदूषित शहरांत भारतातील ६१ शहरे; दिल्ली चौथ्या स्थानी | पुढारी

जगातील टॉप १०० प्रदूषित शहरांत भारतातील ६१ शहरे; दिल्ली चौथ्या स्थानी

बर्ने वृत्तसेवा :  आयक्यू एअर या स्विस कंपनीने मंगळवारी २०२२ चा हवेच्या दर्जाबाबतचा आंतरराष्ट्रीय अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, भारत हा जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदूषित देश ठरला आहे. भारत याआधी हा पाचव्या क्रमांकाचा प्रदूषित देश होता. अहवालात पाकिस्तानचे लाहोर शहर पहिल्या क्रमांकावर, तर चीनचे होटन शहर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर राजस्थानमधील भिवडी आयक्यू एअर या स्विस कंपनीने तिसऱ्या क्रमांकावर आणि दिल्ली चौथ्या क्रमांकावर आहे.

दिल्ली आणि नवी दिल्ली ही दोन्ही शहरे टॉप १० मध्ये आहेत. जगातील १३१ देशांतील मॉनिटरिंग आणि डेटाचा अभ्यास केल्यानंतर कंपनीने हा अहवाल जारी केला आहे. भारतातील १०० शहरांमध्ये जगातील ७ हजार ३०० शहरांच्या तुलनेत जास्त प्रदूषण आहे. २.५ पीएम प्रदूषणापैकी २० ते ३५ टक्के प्रदूषण केवळ वाहतुकीमुळे आहे. उद्योग, औष्णिक विद्युत प्रकल्प आणि बायोमास प्लांट हे त्याचे इतर स्रोत आहेत. २०२१ च्या अहवालात दिल्ली हे सर्वात प्रदूषित शहर होते. यावर्षीच्या अहवालात दिल्ली आणि नवी दिल्ली ही दोन भिन्न शहरे मानली गेली आहेत. दोघांचाही टॉप १० मध्ये समावेश आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत दिल्लीत ८ टक्के सुधारणा झाली आहे.

    आकडे बोलतात…

  • १० टॉप प्रदूषित शहरांपैकी ६ शहरे भारतीय. दिल्ली आणि नवी दिल्ली या दोन्ही शहरांचा समावेश
  • २० टॉप प्रदूषितपैकी १४ शहरे भारतातील आहेत.
  • ५० टॉपमध्ये ३९ शहरे भारतातील आहेत.

Back to top button