वीटभट्टीवर झोपलेल्या ५ जणांचा गुदमरून मृत्यू; छत्तीसगडच्या महासमुंदमधील घटना | पुढारी

वीटभट्टीवर झोपलेल्या ५ जणांचा गुदमरून मृत्यू; छत्तीसगडच्या महासमुंदमधील घटना

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील कुंज बिहारी गढफुझार बसना येथील वीटभट्टीवर मोठी दुर्घटना घडली आहे. वीटभट्टीवर झोपलेल्या पाच मजुरांचा धुरात गुदमरल्याने मृत्यू झाला. तर एक मजूर जखमी झाला असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मजुरांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मजुरांनी वीटभट्टीचे काम ठेक्यावर घेतले होते. विटा भाजण्यासाठी विटभट्टी पेटवली होती. त्यानंतर ते सर्वजण त्याच विटभट्टीवर झोपले. भट्टीतून निघणाऱ्या धुरामुळे झोपलेल्या त्या मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला.

हेही वाचा : 

 

Back to top button