Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात 17 टक्क्यांची वाढ; 10 मार्चपर्यंत 13.73 लाख कोटींचे संकलन | पुढारी

Tax Collection : प्रत्यक्ष कर संकलनात 17 टक्क्यांची वाढ; 10 मार्चपर्यंत 13.73 लाख कोटींचे संकलन

पुढारी ऑनलाइन डेस्क : Tax Collection : गेल्या वर्षीच्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात 17 टक्क्यांची वाढ झाली असून या वर्षी प्रत्यक्ष कर 13.73 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 10 मार्च 2023 पर्यंतची ही आकडेवारी आहे. तसेच याच कालावधीतील गेल्या वर्षीच्या एकूण संकलनापेक्षा या वर्षीचे एकूण संकलन 22.58 टक्क्यांनी जास्त आहे, अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी दिली.

CBDT म्हणाले, Tax Collection : हे संकलन एकूण बजेट अंदाजाच्या 96.67 टक्के आणि FY23 साठी प्रत्यक्ष करांच्या एकूण सुधारित अंदाजाच्या 83.19 टक्के आहे. प्रत्यक्ष करामध्ये वैयक्तिक आयकर आणि कॉर्पोरेट करांचा समावेश असतो. संकलनातील वाढ ही वैयक्तिक आयकर (PIT) संकलनामुळे झाली आहे.

1 एप्रिल 2022 ते 10 मार्च 2023 पर्यंत 2.95 लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे, जो मागील वर्षात याच कालावधीत जारी केलेल्या परताव्यांच्या तुलनेत 59.44 टक्के जास्त आहे, असेही CBDT ने सांगितले. (Tax Collection)

प्रत्यक्ष कर संकलन, परताव्याचे निव्वळ, 13.73 लाख कोटी रुपये आहे. जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील निव्वळ संकलनापेक्षा 16.78 टक्के जास्त आहे.

परताव्याच्या समायोजनानंतर, सीआयटी (कॉर्पोरेट आयकर) संकलनात निव्वळ वाढ 13.62 टक्के आहे आणि एसटीटी (सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स) सह वैयक्तिक आयकर (PIT) संकलन 20.06 टक्के आहे, असे त्यात म्हटले आहे.

हे ही वाचा :

आंतरराष्‍ट्रीय : चीनचा ‘सामरिक शंखनाद’

बहार विशेष : प्रदूषणाची ‘धुळ’वड

Back to top button