कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्‍थानी आज पुन्हा ईडीचा छापा; कार्यकर्त्यांकडून निषेधाच्या घोषणा | पुढारी

कागल : आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्‍थानी आज पुन्हा ईडीचा छापा; कार्यकर्त्यांकडून निषेधाच्या घोषणा

कागल; पुढारी वृत्तसेवा कागल शहरातील आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (शनिवार) सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पुन्हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये छापा टाकला. यावेळी वीस ते पंचवीस सिक्युरिटी गार्ड मुंबई मधून आले होते, तर वीस ते पंचवीस अधिकारी चौकशीसाठी निवासस्थानी आलेले आहेत.

यावेळी शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुश्रीफ यांच्या निवासस्थानी जमा झाले आहेत. या ठिकाणी हिंदी अधिकाऱ्यांचा निषेध केला जात आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांकडून दिल्या जात आहेत. कार्यकर्त्यांकडून या कारवाई विरोधात संतप्त भावना व्यक्त केल्‍या जात आहेत.

आमदार हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू अनवर मुश्रीफ यांच्या घरी ही अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी सुरू केली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी त्यांचे दोन पुत्र आहेत, तर आमदार हसन मुश्रीफ हे निवासस्थानी नसल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून, कारवाईसाठी आलेल्‍या अधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे.

हेही वाचा : 

Back to top button