Ex-Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! आता 'BSF' मध्ये १०% आरक्षण | पुढारी

Ex-Agniveer : अग्निवीरांसाठी खुशखबर! आता 'BSF' मध्ये १०% आरक्षण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीमा सुरक्षा दलातील ((Border Security Force- BSF)) भरती प्रक्रियेत माजी अग्निविरांना १०% आरक्षण देण्याची मोठी घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेतील कमाल वयोमर्यादेतही या उमेदवारांना सवलत देण्याची घोषणा केली आहे.पंरतु, उमेदवार अग्निवीर भरती प्रक्रियेतील कुठल्या बॅचशी संबंधीत आहे त्यावरून त्यांची वयोमर्यादेची सवलत अवलंबून असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने (MHA-Ministry of Home Affairs ) ६ मार्चला यासंदर्भात घोषणा सहा मार्च रोजी अधिसूचनेद्वारे केली आहे. (Ex-Agniveer )

Union Budget : केंद्रीय बजेटमधून अग्निवीरांना करमुक्त सॅल्यूट!

अग्निविरांना आरक्षण देण्यासाठी मंत्रालयाकडून बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (बीएसएफ), जनरल ड्युटी कॅडर रिक्रुटमेंट रुल्स-२०१५ मध्ये संशोधन केले जाईल. नोटीफिकेशन नुसार बीएसएफसच्या भरती परिक्षांमध्ये अग्निविरांना शारिरिक चाचणी परिक्षेतून सूट दिली जाईल.सरकारने अधिकारांचा वापर करीत बीएसएफ, जनरल ड्युटी कॅडर (अराजपत्रित) भरती नियम, २०१५ मध्ये संशोधन करीत बीएसएफ, जनरल ड्युटी कॅडर (अराजपत्रिक) भरती नियम, २०२३ चे नोटिफिकेशन ९ मार्च प्रभावित झाले आहे.

Ex-Agniveer : वयातही सवलत

नियमातील कॉन्स्टेबल पदाशी संबधित भागातील नियमांमध्ये बदल केले जातील. त्यात कमाल मर्यादेतील सवलतीचा उल्लेख केला जाईल.अग्निविरांच्या पहिल्या बॅचला पाच वर्षांची आणि माजी अग्निविरांच्या इतर सर्व बॅचला तीन वर्षांपर्यंत सुट दिली जाईल. यापूर्वी लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केले होते. उमेदवारांना भरती प्रक्रियेपूर्वी लिखीत परिक्षा उत्तीर्ण करावी लागेल.उत्तीर्ण उमेदवार पुढील प्रक्रियेत सहभागी होवू शकतील. भरतीच्या शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय चाचणी होते. भरती प्रक्रियेतील गर्दी कमी करण्यासाठी लष्कराने हा निर्णय घेतला होता.

हेही वाचा 

Back to top button