Benefits Lemon Peel : लिंबूची साल फेकून देऊ नका; असा करा वापर

Benefits Lemon Peel
Benefits Lemon Peel
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाकाहारी असो वा मांसाहारी सर्व जेवणात खास करून लिंबूचा आवर्जून वापर केला जातो. याशिवाय कडक उन्हाळ्यात घामाच्या धारा लागतात, घशाला कोरड पडते, यावेळी आठवते ते लिंबू सरबत. घरी अचानक पै-पाहुणे आल्यास लिंबूचा सरबत हमखास दिला जातो. लिंबूमध्ये क जीवनसत्वासोबत कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक असतात. हे घटक आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तुम्हाला माहितीये का, लिंबूच्या रसाचाच नाही तर त्याच्या सालीचाही चांगला वापर करता येऊ शकतो. ( Benefits Lemon Peel )

एकीकडे दररोजच्या आहारात लिंबूच्या रसाचा भरपूर वापर केला जातो तर दुसरीकडे त्याची साल मात्र, फेकून दिली जाते. लिंबूच्या सालमध्येही अनेक औषधी गुणधर्म आहेत. जाणून घेऊया लिंबाच्या सालीचे फायदे…

पित्त कमी करणे

काही वेळा घाई गडबडीत चमचमीत किंवा उघड्यावरचे पदार्थ खाल्ले जातात. यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होत असतो. अशावेळी जर लिंबाच्या साली किंवा रसाचे सेवन केल्यास पित्त कमी होऊन भूक वाढते. यासोबत अन्न पचण्यास आणि शौचासदेखील साफ होण्यास मदत होते.

रक्ताभिसरण सुधारणे

लिबांचा दररोजच्या जेवणात समावेश केल्याने लिव्हर साफ होऊन रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते.

डोक्याचा ताण कमी करणे

आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच ताण-तणावातून जावे लागते. मात्र, दररोजचा तणाव दूर करण्यासाठी लिंबाच्या सालीचा उपयोग होतो. कारण लिंबाच्या सालीत काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे शरीरातील तणाव दूर करण्यास फायदेशीर असतात.

मधुमेह कमी करणे

दैंनदिन जीवनात मधुमेह आजारांपासून अनेकजण हैराण झाले आहेत. मात्र, मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी लिंबाच्या साल उपयुक्त ठरते.

पचनक्रिया सुधारणे

लिंबाच्या सालीत जीवनत्तव 'क' चे घटक असल्याने ते त्वचेचा कॅन्सर आणि ह्दयाचे आजार दूर होण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकार शक्ती वाढविणे

लिबांच्या सालीत मिनरल्स हे घटक असतात. यामुळे दररोज लिंबूचा वापर केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढून आरोग्य सुधारण्यास मदत होते. रोज एक-दोन ग्रॅम लिंबू किंवा लिंबाच्या सालीचे सेवन केल्यास इन्फेक्शनने पसरणारा ताप आणि सर्दी ८ टक्यांनी कमी होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.

हाडे मजबूत होतात

लिंबाच्या सालीत कॅल्शिअम आणि जीवनस्तव 'क' चे घटक असल्याने मानवी शरीरातील हाडे मजूबत होतात. तर हांडाची झीजदेखील हळूहळू भरून येते.

दात मजबूत करणे

लिंबू दात मजबूत होण्यास मदत करते. याशिवाय सालीची पूड करून दातांना लावल्यास दातांचा पिवळेपणा दूर होतो.

रक्तदाबावर फायदेशीर

लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. जर तुमचे रक्तदाब नियंत्रित असेल तर ह्दयाबाबत उद्भवणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका होते.

वजन कमी करणे

लिंबाच्या सालीमध्ये पॉलिफेनॉल हे गुणकारी घटक असतात जे शरीरातील वाढलेले वजन कमी करण्यास मदत करतात. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) च्या अहवालानुसार, लिंबाच्या सालीमुळे बालपणातील लठ्ठपणा काही प्रमाणात कमी होऊ शकतो.

कोरडे ओठ मऊ करण्यासाठी उपयुक्त

लिंबाच्या सालीची पावडर तयार करून त्यात बदामाचे तेल मिसळून ओठांना लावल्याने कोरडे ओठ मऊ होण्यास मदत होते. तसेच ओठांचा काळेपणा दूर होतो. या पावडरमध्ये गुलाबपाणी मिसळून फेसपॅकप्रमाणे चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील डाग किंवा मुरुम कमी होण्यास मदत होते.

भांड्याचा चिवटपणा काढणे

अनेकवेळी स्वयंपाकाच्या भांड्यांना किंवा भात शिजवताना कुकरच्या आतमध्ये चिवटपणा येतो. हा चिवटपणा साबणानेदेखील जात नाही. अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासल्यास त्यातील चिवटपणा निघून जाण्यास मदत होते. तसेच भात शिजवताना कुकरच्या पाण्यात एक लिंबाची साल टाकल्यास कुकर आतून काळा पडत नाही.

हात-पायाची नखे साफ करणे

लिंबाची साल पायांना किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखे स्वच्छ आणि सुंदर दिसायला लागतात. तर नखांवर चमक देखील येते.

फ्रिजमधील दुर्गंधी दूर करणे

फ्रिजमध्ये आपण भाज्या, फळे, जेवण आणि पाणी, कोल्ड्रिंक्स यासारखे अनेक पदार्थ ठेवत असतो. यामुळे बऱ्याचदा फ्रिजमधून दुर्गंध पसरत असते. मात्र, दोन -तीन लिंबाच्या साली फ्रिजेमध्ये ठेवल्यास दुर्गंधी दूर होते.

मुंग्यांपासून सुटका

घरात जर सारख्या-सारख्या मुंग्या येत असतील तर त्या जागी लिंबाची साल ठेवावी. यामुळे मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो.

त्वचा काळवंडली असेल तर ते दूर करते

हाताचे ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावरदेखील लिबांची साल घासल्यास चेहरा उजळतो. यावेळी लिंबाची साल थेट न वापरता त्यावर थोडे बदाम तेल अथवा कोरफड जेल किंवा मध काही थेंब टाकावे आणि चेहऱ्यावर हळूवार मसाज करावा. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर होऊन तुमची त्वचा उजळ बनेल. यामुळे लिंबूची साल यापुढे फेकून देऊ नका तर त्याचा योग्य वापर करा. ( Benefits Lemon Peel )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news