सीमेवर रस्ते, महामार्गाचे काम करताना पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करा : केंद्राचे निर्देश | पुढारी

सीमेवर रस्ते, महामार्गाचे काम करताना पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्वांचे पालन करा : केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय सीमा आणि प्रत्यक्ष सीमा रेषेच्या शंभर किलोमीटर परिघात रस्ते तसेच महामार्गाचे काम करताना पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्वांचे सक्तीने पालन करावे, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व संबंधित संस्थांना दिले आहेत. उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलन होऊन असंख्य घरांना तडे गेले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्राने ही मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत.

आपत्ती व्यवस्थापन योजना राबविणे, धोक्याची चाचपणी तसेच बोगदे खोदताना इको फ्रेंडली अभ्यास करून आवश्यक त्या दक्षता घेणे गरजेचे असल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष सीमा रेषेच्या शंभर किलोमीटर परिघात रस्ते आणि महामार्गाचे काम करताना पर्यावरण विषयक परवानगी घ्यावी लागणार नाही, असे केंद्राने सात महिन्यांपूर्वी निश्चित केले होते. त्यानंतर आता संबंधीत भागात रस्ते, महामार्गाचे काम करताना पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्वांचे सक्तीने पालन करावे, असे सरकारला सांगावे लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button