T-20 KCC : एका ओव्‍हरमध्‍ये कुटल्या तब्‍बल ४६ धावा! Video Viral

T-20 KCC : एका ओव्‍हरमध्‍ये कुटल्या तब्‍बल ४६ धावा! Video Viral

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट ( Cricket ) हा खेळ अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. हा खेळ खेळताना मैदानावर अशा काही घटना घडतात की त्‍यावर विश्‍वास बसणे कठीण होते. या खेळात एका ओव्‍हरमध्‍ये (षटकात) जास्‍तीत-जास्‍त किती धावा निघतील तर तुम्‍ही म्‍हणाल ३६. ओव्‍हरच्‍या प्रत्‍येक चेंडूवर षटकार मारला तर ३६ धावा होतील. मात्र KCC फ्रेंड्स मोबाईल T20 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्‍ये एका षटकात तब्‍बल ४६ धावा झाल्‍या. या ओव्‍हरचा व्‍हिडिओ व्‍हायरल होत आहे. ( T-20 KCC ) जाणून घेवूया एका ओव्‍हरमध्‍ये ४६ धावा कशा झाल्‍या याविषयी…

नुकतेच ऋतुराज गायकवाड याने विजय हजारे ट्रॉफीमध्‍ये एका षटकात ७ षटकार मारून धमाका केला होता. गायकवाडने एका षटकात तब्‍बल ४३ धावा फटकावल्‍या होत्‍या. असे काहीसे KCC फ्रेंड्स मोबाईल T20 चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 टूर्नामेंटमध्‍ये घडलं. (Franchise League In Kuwait)

फॅनकोड ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये हे फलंदाज वासुदेव डालटा दिसून येते आहे. त्‍याने गोलंदाज हरमनविरुद्ध तुफानी फलंदाजी केली. एका षटकात दोन नो बॉलचा फायदा घेत वासुदेव याने तब्‍बल ४६ धावा केल्‍या.

T-20 Franchise league kuwait : षटकातील धावा चेंडूनिहाय…

पहिला चेंडू – षटकार (नो बॉल) – ७ धावा
पहिला चेंडू – ४ धावा ( बाय )
दुसरा चेंडू – षटकार
तिसरा चेंडू – षटकार (नो बॉल) – ७ धावा
तिसरा चेंडू – षटकार
चौथा चेंडू – षटकार
पाचवा चेंडू – षटकार
सहावा चेंडू – चौकार

षटकात ४६ धावा झाल्‍याचा व्हिडीओ क्रिकेटप्रेमींमध्‍ये तुफान व्‍हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news