Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाची हाडे मिक्सरमध्ये कुटून भुकटी केली, नंतर फेकून दिली | पुढारी

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाची हाडे मिक्सरमध्ये कुटून भुकटी केली, नंतर फेकून दिली

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : १८ मे २०२२ रोजी आफताबने श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबने ऑनलाईन चिकन रोल ऑर्डर केले, ते आल्यावर पोटभर जेवला व नंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. एवढेच नव्हे तर नंतर त्याने श्रद्धाचे शिर वगळता इतर हाडे मिक्सरमध्ये टाकून त्यांची भुकटी केली आणि नंतर ती रस्त्यावर फेकून दिली, असा डोके सुन्न करणारा जबाब पोलिसांच्या आरोपपत्रात नमूद करण्यात आला आहे. (Shraddha Murder Case )

दिल्ली पोलिसांनी दोन महिन्यांच्या तपासानंतर आफताब पुनावाला याच्याविरोधात सहा हजार ६०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात या अतिक्रूर खून प्रकरणाचे बारीक सारीक तपशील देण्यात आले आहेत. आरोपपत्रात म्हटले आहे की, तिच्या शरीराचे तुकडे करून ते एकेक करून नष्ट करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार त्याने करवत, हातोडी, तीन मोठे चाकू आणले. तिची बोटे हातापासून वेगळे करण्यासाठी चक्क हाडे जाळू शकणारी ब्लोगन आणलीआणि आपला कार्यभाग साधला.

Shraddha Murder Case : 6,636 पानी आरोपपत्र 

श्रद्धा वालकर खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पुनावाला याच्यावर 6,636 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यावेळी पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे, आफताबने रागाच्या भरात श्रद्धाचा खून केला. नंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते आपल्या दक्षिण दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमधील फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर छतरपूरच्या जंगल परिसरात हे तुकडे फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा ही 17 मे रोजी तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गुरुग्रामला गेली होती. ती थेट दुस-या दिवशी त्यांच्या घरी परतली. श्रद्धा मैत्रिणीला भेटायला का गेली होती या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात आफताबने श्रद्धाची गळा आवळून हत्या केली.

हेही वाचा 

Back to top button