Vasant Panchami : लग्न ठरत नाही का? उद्या वसंत पंचमीला ही पूजा करून पाहा | पुढारी

Vasant Panchami : लग्न ठरत नाही का? उद्या वसंत पंचमीला ही पूजा करून पाहा

पुढारी ऑनलाइन डेस्क : Vasant Panchami : सध्याच्या परिस्थितीत अनेक तरुण तरुणींचे योग्य वयात विवाह जुळत नाही. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींचे वय वाढत चालले आहे. परिणामी मुलांच्या लग्नासाठी त्यांचे पालकही मोठ्या चिंतेत दिसतात. त्या सर्वांसाठी वसंत पंचमी ही मोठी पर्वणी आहे. वसंत पंचमीवर ज्याप्रमाणे बुद्धीची देवता सरस्वतीची पूजा करतात. त्याच प्रमाणे कामदेव आणि रतीची देखील पूजा केली जाते. यामुळे विवाहेच्छुकांचे विवाह लवकर जुळतात. वैवाहिक संबंधात दुरावा निर्माण झाला असेल तरीही कामदेव आणि देवी रतीची पूजा करण्याची परंपरा आहे.

Vasant Panchami : विवाहासाठी वसंत पंचमीचे महत्व

भारतीय परंपरेत वसंत पंचमी ही विवाहासाठी एक मोठी आणि सर्वोत्तम तिथी मानली जाते. या दिवशी कोणत्याही वेळेत विवाह करू शकतो. या तिथीला विवाहाचा मुहुर्त काढण्याची गरज नसते, अशी मान्यता आहे. वसंत पंचमीपासून वातावरणात तसेच पृथ्वीच्या भूगर्भताही मोठे बदल होतात, असे शास्त्रांनी मानले आहे. आंब्याला देखील याच काळात मोहोर फुटण्यास प्रारंभ होतो. आंब्याला आपल्या संस्कृतीत सुफलनाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळेच विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी वसंत पंचमीच्या मुहुर्तावर कामदेव आणि देवी रतीची शास्त्रोक्त पूजा केल्यास लग्न जुळण्यात येणा-या अडचणी दूर होतात, अशी पारंपारिक मान्यता आहे.

Vasant Panchami : का करतात कामदेव-रतीची पूजा, काय आहे महत्व

धार्मिक शास्त्रांमध्ये कामदेवाला प्रेमाचा स्वामी म्हटले आहे तर देवी रतीला मिलापची देवी मानले गेले आहे. शास्त्रांप्रमाणे अशी मान्यता आहे की कामदेव आणि त्यांची पत्नी रती यांच्या भाव-विभोर, प्रेम आणि नृत्याने समस्त मनुष्य आणि पशु-पक्ष्यांमध्ये ही प्रेम भावनेची उत्पत्ती होते. कामदेव आणि देवी रती यांच्या कृपेनेच प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात मधुरता कायम राहते. त्यामुळेच वसंत पंचमीला कामदेव आणि देवी रती यांची पूजा केली जाते.

मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी देखील ही पूजा करतात

प्रेम विवाह ही संकल्पना भारतीयांसाठी काही आता नवीन राहिलेली नाही. आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपला आयुष्यभराचा जोडीदार व्हावा यासाठी देखील कामदेव आणि देवी रतीची पूजा केली जाते. असे म्हणतात कामदेव आणि देवी रतीची पूजा केल्याने मनासारखा जोडीदार मिळून वैवाहिक आयुष्यातही कोणतीही समस्या येत नाही.

Vasant Panchami : शास्त्रोक्त पूजा विधी

पूजा स्थळी एका पांढरे कापड अंधरावे. त्यावर कामदेव आणि रती यांचे छायाचित्र स्थापित करावे. त्यानंतर ताजी फूले, पिवळा किंवा लाल चंदन, गुलाबी रंगाचे वस्त्र, सुगंधीत द्रव्ये जसे की अत्तर इत्यादी, नैसर्गिक सौंदर्य सामग्री, सुगंधित धूप किंवा दीवा, पान-सुपारी इत्यादी गोष्टी कामदेव आणि देवी रती यांना अर्पण कराव्या. त्यानंतर आपल्या आयुष्यात सुखी संसारासाठी प्रेमाच्या मागणीसाठी प्रार्थना करावी. मनासारखा जोडीदार मिळवण्यासाठी त्याचे नाव घेऊन प्रार्थना करावी.

(वरील माहिती परंपराच्या मान्यतेवर आधारित आहे, पुढारी ऑनलाइन त्याची हमी घेत नाही)

हे ही वाचा :

Gautam Adani | गौतम अदानींचे एका दिवसात ६ अब्ज डॉलर उडाले, शेअर्स धडाधड कोसळल्याने संपत्तीत घट

The signature : ‘सही’त हे बदल करा आणि व्हा ‘मालामाल’, जाणून घ्या सही कशी असावी आणि तिचे फायदे

 

Back to top button