जालना : बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवंल होतं : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

जालना : बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवंल होतं : प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : तुमच्या रक्तात बेईमानी आहे आणि बेईमानी करून तुम्ही राज्य मिळवंल होतं असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे पिता- पुत्रांना लगावला. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे शुक्रवारी (दि.२०) रोजी रात्री बावनकुळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते प्रसार माध्यमाशी बोलत होते.

शिवसेना कुणाची? याबद्दल बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, निवडणूक आयोगावर सर्वांनी विश्वास ठेवावा, आदित्य ठाकरे यांना एवढी घाई का आहे?. सत्याचा विजय होईलच, सत्य १२ कोटी जनतेला माहित आहे. तर खरं सत्य काय आहे हे निकाल आल्यावर स्पष्ट होईल. ३० जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीबद्दल बोलताना म्हणाले की, हा टेक्निकल प्रश्न असून निवडणूक आयोगाकडे प्रकरण चालू आहे. आयोगाचा निर्णय अंतिम आहे. मी व कोणी घाई करून काहीही उपयोग नाही, आयोगाच्या निकालाची वाट पहावी लागणार आहे असेही ते म्हणाले.

घटना बाह्य सरकार त्यांनी बनवंल होतं. आता जे शिंदे -फडणवीस यांचे सरकार आहे ते नियमातलं व जनतेच्या मनातलं सरकार आहे. जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ४ हजारांहून अधिक ग्रामपंचायत निवडणूक जवळ आल्या आहेत. त्याचसोबत विधानसभा व लोकसभेला भाजपचे आमदार- खासदार जनता निवडून देतील अशी आशा आहे. उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे सरकार बेईमानीच व नियम बाह्य सरकार होत अशी टीका बावनकुळे यांनी ठाकरे पिता- पुत्रावर केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button