नगर : एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश ; दुसरा फरार | पुढारी

नगर : एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश ; दुसरा फरार

संगमनेर पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहरातील जाणता राजा मैदान रोडवरील शेवटचे टोक असलेल्या महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले तर दुसरा अंधाराचा फायदा घेत फरार झाला. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोघा अज्ञात चोरट्यांनी लोखंडी टामीच्या साहाय्याने एटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

मात्र एटीएम लुटीच्या घटनाची तीव्रता लक्षात घेता महाराष्ट्र बँकेने आपल्या सर्व एटीएम सेंटरवरती ‘डिजीटल’ सुरक्षा यंत्रणा बसविली आहे. चोरट्यांनी एटीएमच्या पत्र्याला लोखंडी टामी लावून उचकटण्याचा प्रयत्न करत असताना याच डिजीटल यंत्रणेनेचा संदेश थेट बँकेच्या हैदराबादच्या मुख्य शाखेला गेला तेथून बँकेच्या अधिका-यांनी तात्काळ नगर येथील नियंत्रण कक्षाच्या अधिका ऱ्यांशी संपर्क साधला. अ नगर येथील नियंत्रण कक्षाने घटनेचे गांभीर्य ओळखून बिनतारी यंत्रणेद्वारा माहिती संगमनेरच्या शहर पोलिसांना देत तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या.  त्या वेळी ठाणे अंमलदार असणारे पोलीस निरीक्षक शिवाजी फटांगरे यांनीही माहिती गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी गणेश घुले विवेक जाधव यांना दिली त्यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार सचिन उगले व अजय आठरे आदी कर्मचारीही घटनास्थळी गेले असता चोरटे आपल्या जवळ असणाऱ्या लोखंडी टामीच्या साहा य्याने एटीएमचा पत्रा तोडीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

मात्र त्यातील एका चोरट्याला पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तेथून धूम ठोकली तसेच पोलिसांना प्रत्यक्ष पाहून दुसर्‍याने सुद्धा तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्या चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यातील एकाची गचांडी पकडत त्याला खाली पाडले. तर दुसरा चोर मात्र अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला.

या प्रकरणी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्था पक अक्षय जवरे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी त्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आणि पोलिसांनी पाठलाग करून पकडलेल्या मंगेश बाळु गांगुर्डे (वय 20, रा.चास, ता.अकोले) याला अटक करीत त्याच्या मुसक्या आवळल्या असून एटीएम फोडण्यासाठी त्या चोरट्यांनी वापरलेली लोखंडी टामीही पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहे. पोलिसांनी तत्परता दाखवून केलेल्या या धडक कारवाईचे मात्र संगमनेरकरांनी स्वागत केले आहे.

चोरटे एटीएम फोडत असल्याची माहिती समजताच रात्रीच्या गस्तीवर अस लेले गणेश घुले व विवेक जाधव या दोघां पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यादोन्ही चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यातील एकाने आपल्याकडील लोखंडी टामीने त्या दोघांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र या पोलिसांमधील विवेकजाधव या पोलीस कर्मचाऱ्यांच्या हाताला मात्र किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे मात्र त्यांनी त्याची ही पर्वा न करता त्या चोरट्याला पकडत त्याच्या मुसक्या आवळल्या.

Back to top button