Teacher : ‘सर’ किंवा ‘मॅडम’ पेक्षाही ‘टिचर’ म्हणणे अधिक नैसर्गिक : केरळ बाल हक्क समितीचे निर्देश | पुढारी

Teacher : 'सर' किंवा 'मॅडम' पेक्षाही 'टिचर' म्हणणे अधिक नैसर्गिक : केरळ बाल हक्क समितीचे निर्देश

पुढारी ऑनलाईन: Teacher : सर्व शाळेतील शिक्षकांना, त्यांचे लिंग काहीही असो, त्यांना ‘सर’ किंवा ‘मॅडम’ ऐवजी ‘टिचर’ असे संबोधने अधिक नैसर्गिक असल्याचे मत केरळ बालहक्क आयोगाच्या एका समितीने मांडले आहे. त्यामुळे शाळेतील शिक्षकांना टिचर असेच संबोधले जावे, असे निर्देश केरळच्या बाल हक्क समितीने दिले आहेत.

याविषयी दिलेल्या आदेशात बाल हक्क समितीने पुढे म्हटले आहे की, ‘सर’ किंवा ‘मॅडम’ अशा सन्मानापेक्षा टीचर हे अधिक लिंग तटस्थ वाटते. शाळांमध्ये लिंग काहीही असले तरी शाळेतील शिक्षकांना टिचर म्हणूनच संबोधले जावे. ‘सर’ आणि ‘मॅडम’ या वाक्यांचा वापर टाळा असेही या आदेशात म्हटले आहे.

Teacher : आपल्या आदेशात, या समिती पुढे म्हटले आहे की, सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘टीचर’ हा शब्द वापरण्यासाठी, निर्देश देण्यासाठी पावले उचलली जावी, कारण हा शब्द त्यांना आदराने आणि लिंगभेदाशिवाय संबोधित करण्यासाठी योग्य आहे. सर किंवा मॅडम हे शब्द शिक्षकांचा सन्मान या संकल्पनेशी जुळत नाहीत, असे निरीक्षण समितीने नोंदवले आहे. ‘टीचर’ हा शब्द शिक्षक आणि विद्यार्थ्यांना अधिक जवळ आणेल, असेही या समितीने म्हटले आहे. सामान्य शिक्षण विभागाच्या संचालकांना या संदर्भात ‘कारवाई’ अहवाल दोन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

यानंतर केरळ बाल हक्क समितीचे अध्यक्ष केव्ही मनोज कुमार आणि सदस्य सी. विजयकुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने बुधवारी सामान्य शिक्षण विभागाला राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘टिचर’ हा शब्द वापरण्याच्या सूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षकांना त्यांच्या लिंगानुसार ‘सर’ आणि ‘मॅडम’ संबोधताना भेदभाव संपुष्टात आणण्यासाठी एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करताना हे निर्देश देण्यात आले. शिक्षकांना लिंग-तटस्थ पद्धतीने संबोधित केले जावे, अशी तक्रारकर्त्याची इच्छा होती.

हे ही वाचा :

Rashid Khan: अफगाणिस्तानविरुद्ध न खेळण्याच्या निर्णयानंतर राशीद खानने दिला ऑस्ट्रेलियाला इशारा

उर्फीनं चांगले कपडे घालून महिला आयोगात जावं; चित्रा वाघचा टोला

Back to top button