हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीची छापेमारी १२ तासांनी थांबली | पुढारी

हसन मुश्रीफ यांच्या घरावरील ईडीची छापेमारी १२ तासांनी थांबली

कागल, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवास स्थानावर केंद्रीय तपास यंत्रणांनी टाकलेले छापे अखेर 12 तासांनी थांबली. सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ म्हणाले, तपास यंत्रणेला त्यांनी विचारलेली सर्व माहिती दिली आहे. राजकीय अकसापोटी छापा टाकण्यात आलेला आहे. इडी अधिका-यांकडून वेगवेगळे प्रश्न विचारले. त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आली. सर्वसामान्य जनता जोपर्यंत आमदार हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणीही आमचे काही करू शकत नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

दरम्‍यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागल (कोल्हापूर) येथील घरांवर ईडीने छापे टाकले आहेत. कागल शहरातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाच वेळी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या घरांच्या परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (ED raids NCP leader Hasan Mushrif)

हसून मुश्रीफ आणि प्रकाश गाडेकर यांच्या निवासस्थानी दिल्ली पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या छाप्याची माहिती स्थानिक पोलिसांना नसल्याचे समजते. मुश्रिफांच्या घरावर छापा पडला असल्याचे समजतात मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी निवासस्थानासमोर तसेच गैबी चौकात गर्दी केली.

.हेही वाचा 

महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे ‘वर्क फॉर्म जेल’ होते; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची टीका 

पुण्यातही मुश्रीफ यांच्या दोन मालमत्तांवर ईडीचे छापे, पुन्हा काही कागदपत्रे जप्त ?

हसन मुश्रीफांचे कार्यकर्ते आक्रमक, कागल बंदची हाक (VIDEO)

Back to top button