Electric Scooter खरेदी करायची आहे? ‘या’ स्‍कूटर ठरतील चांगला पर्याय | पुढारी

Electric Scooter खरेदी करायची आहे? 'या' स्‍कूटर ठरतील चांगला पर्याय

पुढारी ऑनलाईन डेस्क : पेट्रोलच्‍या वाढत्‍या दरांमुळे आता ग्राहकांची इलेक्ट्रिक स्कूटरला (Electric Scooter) पसंती मिळत आहे. पर्यावरण स्‍नेही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार्‍या ग्राहकांसाठी या वर्षी काही नवे पर्याय उपलब्‍ध असणार आहे. जाणून या  घेवूयात या इलेक्ट्रिक स्कूटर्सविषयी…

1. Gravton Quanta

Gravton Quanta

क्वांटाने 2022 मध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. ही हैदराबादमधील कंपनी आहे. Gravton Quanta मध्ये ड्युअल बॅटरी (Li-ion) सह 320 किमी/चार्ज आणि सिंगल बॅटरीसह 150km/चार्ज आहे. या बाइकमध्ये 3kW ची हब मोटर आहे जी 172Nm टॉर्क देते. जलद गतीने होणाऱ्या चार्जरने या गाडीची एका बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास 90 मिनिटे लागतात.  साध्या चार्जरने, त्यासाठी 3 तास लागतात. ई-बाईकचा टॉप स्पीड तासाला ७० किमी आहे. वाहनाची (एक्स-शोरूम) किंमत 99,000 रूपये एवढी आहे. ग्रॅव्हटन क्वांटा ई-बाईक तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. काळा, पांढरा आणि लाल. आणि ही बाइक इको, स्पोर्टस, सिटी या तीन मोडमध्ये चालवू शकता.

2. Ola Electric S1 Pro

Ola S1 Pro ही त्याच्या फीचरमुळे बाजारात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या स्कूटरपैकी एक आहे. त्याची 8.5 kW ची मोटर ताशी 115 किमीचे टॉप स्पीड आहे. याला 4 kWh बॅटरी आणि ARAI प्रमाणित 181 किमी चार्ज आहे. एका चार्जवर स्पोर्ट मोडमध्ये 102 किमी आणि नॉर्मल मोडमध्ये 127 किमी वेगाने जावू शकते. नुकत्याच घोषित केलेल्या MoveOS 2 अपडेटने इतर वैशिष्ट्यांसह “इको” मोड देखील आणला. ज्यामुळे 170 किमी पर्यंत “ट्रू रेंज” आणण्यास मदत होते. बॅटरी तंत्रज्ञानामध्ये रोज नवनवीन अपडेट येत आहे. ज्यामुळे उत्पादक ग्राहकांना विविध उत्पादने ऑफर करु शकतात. या ओला इलेक्ट्रिक S1 प्रो स्कूटरची किंमत 99,999 ते 1,39,999 रुपये आहे.

3. Vida V1

Vida V1 ही Hero इलेक्ट्रिक स्कूटरने उत्पादित केलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये V1 Pro आणि V1 Plus या दोन प्रकारांत आणि तीन रंगांसह लॉन्च करण्यात आली होती. या स्कूटरची कंपनीने दावा केलेली रेंज 165 किमी आहे. तसेच यामध्ये सोयीनुसार काढता येईल अशी लिथियम-आयन बॅटरी आहे. जी Vida V1 Pro ला शक्ती देते. तर 3.44 kWh ची एक लहान बॅटरी आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला 0-80% पर्यंत वाहन चार्ज करण्यासाठी सुमारे 6 तास लागतात. याचा टॉप स्पीड ताशी 80 किमी इतका आहे. बॅटरीची वॉरंटी तीन वर्षांची आहे. इलेक्ट्रिक स्कूटरच्या अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये 60 मिनिटांच्या आत ऑन-साइट दुरुस्ती आणि VIDA ऍप्लिकेशन आहे. स्कूटरमध्ये इको, स्पोर्टस, सिटी असे तीन मोड आहेत. याची किंमत १.२८ लाख ते 1.39 लाखापर्यंत आहे.

4. Okinawa Okhi 90

Okinawa Okhi 90 हे मॉडेल 2022 मध्ये चार रंगांमध्ये लॉन्च करण्यात आले होते. Okhi 90 मध्ये 60 इंच अलॉय व्हील आहेत. जो भारतातील ई-वाहनात वापरला जाणारा पहिले सेट होते. Okinawa Okhi 90 ची रेंज 50 किमी/ चार्ज आहे. यात काढता येण्यासारखी बॅटरी आहे, जी घरीच चार्ज करता येते. वाहनाची चार्जिंग वेळ 5-6 तास आहे जी 3.6 kWh लिथियम-आयन (डिटेचेबल बॅटरी) चार्ज करते. वाहनाची मोटर 2500 W, BLDC मोटर मिड-ड्राइव्ह आहे. जी 80 ते 90kmph चा टॉप स्पीड देते. वाहनाची एक्स-शोरूम किंमत रु. 1,86,000 आहे. तर त्याची प्री-बुकिंग रक्कम रु. 2,000. Okhi 90 चे अतिरिक्त फायदे मिळतात. जसे की स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि पोर्टेबल बॅटरी ज्यामुळे राइड अधिक मजेदार बनते.

5. Okaya Faast F4

Okaya Faast F4 2022 मध्ये लाँच करण्यात आले. आणि ते तंत्रज्ञान, परफॉरमन्स आणि बॅटरीमध्ये अव्वल स्थानावर आहे. Okaya Faast F4 स्कूटरमध्ये लिथियम फॉस्फेट बॅटरी आहे जी नवीन ई-स्कूटरला 4.4 kW ची शक्ती देते. ज्याला तीन वर्षांच्या वॉरंटी आहे. स्कूटर एका चार्जवर 150 किमी अंतर पार करू शकते. काही राइडिंगचे स्पीड असल्यास या स्कूटरद्वारे 200 किमी अंतर गाठले जाऊ शकते. हे 1.2 kW BLDC मोटरसह 60-70 kmph च्या सर्वोच्च गतीला स्पर्श करण्यास सक्षम आहे. इलेक्ट्रिक स्कूटरला वाहन चार्ज करण्यासाठी अंदाजे ५-६ लागतात. याची किंमत 1.09 लाख आहे.

6. Ather 450X

एथर एनर्जी हा इलेक्ट्रिक जगतातील नवीन बझवर्ड आहे. या स्कूटरची प्रमाणित रेंज 146 किमी/चार्ज आहे. मुळ रेंज 105 km आहे जी 3.3 सेकंदात 0-40km च्या वेगासह येते. यात 6,200W ची मोटर आहे. 80 kmph याचा दावा केलेला टॉप स्पीड आहे. बॅटरीची क्षमता 3.7kW आहे. ज्याची चार्जिंग वेळ 4 तास 30 मिनिटे आहे. ती बॅटरी 0-80% पर्यंत शूट करते. बॅटरीला तीन वर्षांची वॉरंटी आहे. वाहनाची एक्स-शोरूम किंमत रु. 1.36 – 1.58 लाख आहे. (Electric Scooter)

हेही वाचा : 

Back to top button