Bharat Jodo Yatra : 9 दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा आजपासून पुन्हा सुरू | पुढारी

Bharat Jodo Yatra : 9 दिवसाच्या विश्रांतीनंतर भारत जोडो यात्रा आजपासून पुन्हा सुरू

पुढारी ऑनलाइन डेस्क : काँग्रेस नेता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली (Bharat Jodo Yatra)भारत जोडो यात्रा जवळपास 9 दिवसाच्या विश्रांतीनंतर आजपासून पुन्हा सुरू होणार आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या माहितीनुसार, ही यात्रा आज तीन जानेवारीला उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश करेल. नंतर 120 किलोमीटरचा प्रवास करून पाच जानेवारीला हरियाणात पोहोचणार आहे. भारत जोडो यात्रा 24 डिसेंबरला दिल्ली येथे पोहोचली होती. त्यानंतर यात्रा शीतकालीन विश्रांतीसाठी थांबली आहे.

(Bharat Jodo Yatra)भारत जोडो यात्रा कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबरला सुरू झाली. या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगना, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि हरियाणाच्या काही भागातून मार्गक्रमण केले आहे. ही यात्रा सध्या दिल्लीत असून आज उत्तर प्रदेशमध्ये पोहोचणार, अशी माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी दिली आहे. या यात्रेचे समापन जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे.
(Bharat Jodo Yatra) या यात्रेत आतापर्यंत राजकीय, सामाजिक, चित्रपट आदी विविध क्षेत्रांतील व्यक्तिंनी आपला सहभाग नोंदवला आहे. माहितीनुसार आतापर्यंत 110 दिवसात 3000 किमी पेक्षा अधिक अंतर कापले आहे. काँग्रेसचा दावा आहे की, भारत जोडो यात्रा ही इतिहासातील आजपर्यंतची सर्वात प्रदीर्घ पदयात्रा आहे.

(Bharat Jodo Yatra) यात्रा 26 जानेवारी रोजी श्रीनगर येथे समाप्त होईल. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार भारत जोडो यात्रा नंतर काँग्रेस हाथ से हाथ जोडो हे अभियान सुरू करणार आहे. याचे नेतृत्व प्रियंका गांधी यांच्यावर सोपवले आहे.

India vs Sri Lanka : नवे वर्ष.. नवा संघ… नवी मालिका!

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी म्हणाले, ‘लग्नासाठी मला अशी मुलगी आवडेल जी….’

Back to top button