New Year Tips : नवीन वर्षाच्या नवीन संकल्पांसाठी या ‘खास’ टिप्स | पुढारी

New Year Tips : नवीन वर्षाच्या नवीन संकल्पांसाठी या 'खास' टिप्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : New Year Tips : नवीन वर्षाला नुकतीच सुरवात झाली आपल्यापैकी अनेकजणांनी वाजत – गाजत जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत केलं. नवीन वर्षाचे निदान काही दिवस तरी सतत समोर येणारा प्रश्न म्हणजे यंदाच्या वर्षी काय संकल्प केला. तुमच्या आमच्या समोर एकदा तरी हा प्रश्न येतच असतो.

New Year Tips : अनेकांनी नवीन वर्षात काही ना काही संकल्प केलेला असणारच. वर्षाच्या सुरुवातीचे काही दिवस हा संकल्प अगदी कसोशीने पाळला जातो. त्याच्याशी संबंधित प्रत्येक बाब लक्षपूर्वक केली जाते. पण जसजसा वर्षाचा पहिला महिना संपत जातो. तसं या संकल्पाची दृढता कमी होत जाते. अनेकदा दुसऱ्या महिन्यापर्यंत आपण कोणता संकल्प केला होता हे देखील अनेकांना आठवत नसतं. हे टाळायचं असेल तर या टिप्स जरूर ट्राय करा…

New Year Tips : स्वत:सोबत प्रॉमिस करा : अनेकजण संकल्प करतानाच त्याच्याबाबत फारसे गंभीर नसतात. किंवा संकल्प पूर्ण करणं हा विषय तो नीट न पाळण्याशीच जोडतात. पण हे टाळा. कोणताही सकारात्मक संकल्प तुमच्या प्रगतीचा मार्ग बनत असतो. त्यामुळे तो पूर्णपणे पाळण्याचं प्रॉमिस करा.

New Year Tips : कृतीत नावीन्य आणा : सतत तेच तेच केल्याने त्या गोष्टीतील रस संपण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा.

New Year Tips : सकारात्मक बोला : अनेकदा आपणच आपल्या संकल्पाबाबत नकारात्मक बोलत राहतो. त्यामुळे आपसूकच त्याबद्दल नकारात्मक वातावरण तयार होतं. या उलट आपल्या संकल्पाबाबत सकारात्मक बोलत राहिल्याने तो पूर्ण करण्याची ऊर्जा मिळत राहते.

New Year Tips : छोट्या छोट्या स्टेप्स : मुळातच सुरुवात अगदी छोट्या स्टेप्सनी करा. एक स्टेप यशस्वीपणे पूर्ण केली की त्याबाबत नोंद करून ठेवा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.

हे ही वाचा :

New Year 2023 celebrations | नवीन वर्षाचा जल्लोष, ‘स्विगी’वरून ३.५० लाख बिर्याणीची ऑर्डर फस्त, पिझ्झा, चिप्स आणि बरंच काही….

New Year Resolution : नववर्षात स्ट्रेस आणि टेन्शन फ्री राहायचंय? दिनचर्येत करा ‘हे’ बदल

Back to top button