घृणास्पद ! दहा वर्षांच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे

घृणास्पद ! दहा वर्षांच्या मुलीशी 42 वर्षांच्या पोलिसाचे अश्लील चाळे
Published on
Updated on

ओझर : नारायणगावच्या नजीक एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करण्याचा गंभीर प्रकार ओतूर(ता.जुन्नर) पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक नारायण भाऊसाहेब बर्डे (वय 42) याने केला आहे. या पोलीस कर्मचार्‍याच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सोमवारी महात्मा गांधी जयंतीच्या दिवशीच (दि. 2) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पोलिसाने हे घृणास्पद कृत्य केले असल्याने संतापाची भावना आहे. बर्डे विरुद्ध विनयभंग आणि पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे घृणास्पद कृत्य केल्यानंतर बर्डे हा एका खासगी रुग्णालयात दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला रात्री उशिरा अटक केली आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news