दररोज सकाळी घ्या सब्जा बी, होतील ‘हे’ आश्चर्चकारक लाभ | Basil seeds

दररोज सकाळी घ्या सब्जा बी, होतील ‘हे’ आश्चर्चकारक लाभ | Basil seeds

पुढारी ऑनलाईन : निरोगी शरीरासाठी आहार फार महत्त्वाचा असतो. चांगल्या सवयी आपल्याला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतात. भरपूर जीवनसत्त्वे, खनिजं असलेली अल्प किंमतीतील पण बहुगुणी औषधी गुणधर्म असणारी बी म्हणजे सब्जा. दररोजच्या आहारात सब्जा बीचा समावेश केला तर त्याचे फार चांगले फायदे होतात. Basil seeds

Basil seeds सब्जा बीमध्ये औषधी गुणधर्म

सब्जामध्ये ओमेगा ३ हे फॅटी ॲसिड, A, B, E ही जीवनसत्त्वे, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि लोह चांगल्या प्रकारे असतात.
सब्जामध्ये पेक्टिन नावाचा एक घटक असतो, त्यामुळे पोटभरल्यासारखे वाटते. त्यामुळे सतत भूक लागत नाही. सब्जामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड असते. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅटमध्ये घट होण्यासाठी मदत होते. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांना सब्जा बी फारच फायद्याच्या असतात. सब्जामुळे पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहते.

सब्जाचे बी केव्हा घ्यावेत?

सब्जाचे बी हे सकाळी रिकाम्या पोटी घेणे फार फायद्याचे ठरते. यासाठी सब्जाचे एक चमचा बी घ्यावेत आणि ते एक ग्लास पाण्यात भिजवावेत आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी सब्जा बी फार उपयुक्त ठरतात, त्यामुळे दररोज सकाळी, अशा प्रकारे सब्जा बी घेणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news