Acid Attack : शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला… | पुढारी

Acid Attack : शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीत द्वारका डिस्ट्रिक्ट भागामध्ये एका शाळकरी मुलीवर ॲसिड हल्ला झाल्याची घटना आज (दी.१४) सकाळी घडली आहे. ॲसिड फेकणारे दोघेजण ओळखीचेच असल्याचे निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले असून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. तसेच पीडित मुलीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी, आज सकाळी नऊच्या सुमारास पीडित मुलगी तिच्या लहान बहिणीसोबत असताना दोन ओळखीच्या व्यक्तींकडून तिच्यावर ॲसिड हल्ला करण्यात आला. यानंतर संबंधित मुलीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुलीवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

हे वचलंत का?

Back to top button