कुर्ला इमारत दुर्घटनाप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल : एकाला अटक!

कुर्ला इमारत दुर्घटनाप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल : एकाला अटक!

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा :  कुर्ला नेहरूनगर येथील नाईक नगर को ऑप हौसिंग सोसायटीमधील सी क्रमांकाची इमारत सोमवारी रात्री कोसळून १९ जणांचा मृत्यू झाला होता. या दुघर्टनेत १५ पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. नेहरूनगर पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दुर्घटनेला जबाबदार असलेल्या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी एकूण चार इमारती आहेत. त्यांची अवस्था जीर्ण झाली आहे. पालिकेने या चारही इमारती २०१३ मध्ये धोकादायक घोषित केल्या होत्या. २०१६ मध्ये इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद केला होता. मात्र तरी देखील काही रहिवाश्यांनी इमारत दुरुस्ती केल्यानंतर स्वतः इतरत्र राहून दुसऱ्याला भाड्याने घरे दिले. त्यांना इमारत धोकादायक असल्याचे माहिती असूनही, त्यांनी इतरांचा जीव धोक्यात घातला. घर मालक रजनी चेतन राठोड, किशोर नारायण चव्हाण, बाळकृष्ण राठोड यांच्यासह इतर मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दिलीप कृष्णा विश्वास याने ही इमारत कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकते, याची माहिती असूनही घरमालकांच्या संगनमताने स्वतःच्या गावाकडील काही व इतर असे ३७ कामगारांना भाड्याने घेतलेल्या धोकादायक घरांमध्ये ठेवले. कामगारांच्या मृत्यूला जबाबदार ठरला. त्यामुळे दिलीप कृष्णा विश्वास याला अटक करण्यात आले आहे, अशी माहिती पाेलिस सूत्रांनी दिली.

हेही वाचा  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news