Himachal Pradesh Assembly Election Result 2022 : काँग्रेसचे पारडे जड, 38 जागांवर आघाडी… | पुढारी

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 : काँग्रेसचे पारडे जड, 38 जागांवर आघाडी...

पुढारी ऑनलाइन डेस्क : Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले. मतदानाच्या दिवशी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार विधानसभेच्या निवडणुकीसाठी 70.94 टक्के मतदान झाले होते. आज मतमोजणी होणार आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशच्या या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच सोबत गुजरातचे देखील निकाल आजच जाहीर होणार आहे. या दोन्ही विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे संपूर्ण भारताचे लक्ष आहे.

निकालांचे अपडेट सुरू झाल्या पासूनच हिमाचल प्रदेशमध्ये भाजप-काँग्रेस दोन्हींमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. सध्या कधी मी कधी तू…अशी परिस्थिती आहे. जसजसे निकालांचे कल हाती येत आहे. तसतसे कधी भाजप आघाडी घेत आहे तर कधी काँग्रेस आघाडी घेत आहे. तर कधी दोन्ही पक्ष बरोबरीने चालत आहे.

Himachal Pradesh Assembly Election Result 2022 Live Updates :

  • अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांच्या कलमध्ये काटे की टक्करमधून बाहेर पडून हळूहळू काँग्रेसच्या बाजूने वळत आहे. 38 जागांवर आघाडी घेत काँग्रेसचे पारडे जड झाले आहे. तर भाजप 27 जागांवरच आघाडी करत आहे.
  • मंडी विधानसभा जागेतून भाजपचे अनिल शर्मा पुढे
  • काँग्रेसचे उमेदवार मुकेश अग्निहोत्री पुढे
    उना जिल्ह्यातील कुतलेहारमधून काँग्रेसचे उमेदवार देवेंद्र कुमार भुट्टो आघाडीवर आहेत. हरोलीमधून काँग्रेसचे उमेदवार मुकेश अग्निहोत्री पुढे आहेत.
  • कांगडा जिल्ह्यातील पालमपूरच्या बडसरमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे.
    भाजप-449
    काँग्रेस – 234
  • दार मतदारसंघात काँग्रेस आघाडीवर आहे
    भाजप- 306
    काँग्रेस- 352
  • मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना 2226 मतांची आघाडी आहे
  • मुख्यमंत्री जयराम ठाकूर फर्स्ट रोडमध्ये सेरजमधून २२२६ मतांनी आघाडीवर आहेत
  • कांगडा जिल्ह्यातील पालमपूरमध्ये भाजपचे त्रिलोक कपूर 755 मतांसह आघाडीवर आहेत,
  • तर काँग्रेसचे आशिष बुटेल 540 मतांनी आघाडीवर आहेत.
  • सोलनमधील नालागढमधून अपक्ष उमेदवार केएल ठाकूर १८४४ मतांनी आघाडीवर आहेत.
  • हिमाचल प्रदेशच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये मुख्यमंत्री जयराम ठाकूर आघाडीवर
  • हिमाचल प्रदेशातील कुल्लू विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र सिंह आघाडीवर आहेत. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला आहे.
  • हिमाचल प्रदेशातील दरांग मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार कौल सिंह आघाडीवर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये त्याने आघाडी घेतली आहे.
  • पहिल्या टप्प्यातील निकालांमध्ये भाजप आणि काँग्रेस दोन्ही बरोबरीत,
  • काटे की टक्कर भाजप – काँग्रेस 34-34 जागांवर आघाडीवर

Himachal Pradesh Election 2022 : परंपरा मोडून भाजप पुन्हा सत्ता राखणार का?

हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 68 जागा आहे. त्यापैकी सत्ता स्थापन करण्यासाठी 35 जागा जिंकणे महत्वाचे आहे. हिमाचल प्रदेश हे छोेटे राज्य असले तरी देखील येथील निवडणूक लक्षवेधी ठरते ती हिमाचल प्रदेशच्या मतदारांच्या परंपरेमुळे. गेल्या 2007 पासून इथे कायमच आलटून पालटून सरकार सत्तेत येत असते. २००७ मध्‍ये भाजप, २०१२ मध्‍ये काँग्रेस, २०१७ मध्‍ये भाजप तर यंदा… कोण येणार हे पाहण्यासाठी सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच हिमाचलची ही परंपरा मोडून भाजप पुन्हा सत्ता स्थापन करणार का? का काँग्रेस भाजपला टक्कर देऊन सत्ता स्थापन करणार हे पाहणे इथे रंजक ठरणार आहे.

Himachal Pradesh Election 2022 : भाजप काँग्रेसमध्ये मुख्य लढत मात्र, आप देखील रिंगणात

हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत असली तरी या वेळी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत आम आदमी पक्ष देखील रिंगणात आहे. दिल्ली, पंजाब नंतर आपने हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या निवडणुकीत देखील संपूर्ण ताकदीने प्रचार केला होता.

Himachal Pradesh Election 2022 : एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल

दरम्यान, निवडणूक पूर्व एक्झिट पोलमध्ये भाजपला सर्वात जास्त कौल मिळाला आहे. एकूण मतदानापैकी 47 टक्के वोट शेयर हे भाजपला मिळाले होते. तर 41 टक्के वोट शेयर हे काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत हिमाचल प्रदेशच्या अनेक जागांवर काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. अन्य पक्ष व अपक्षांना 10 टक्के वोट शेअर तर आपने जरी निवडणूक रिंगणात उतरली असली तरी आपला फक्त 2 टक्के वोट शेअरचा कौल एक्झिट पोलमध्ये जाणवला आहे. एक्झिट पोल नुसार भाजपला 35 ते 40 जागा मिळू शकतात. काँग्रेसला 20 ते 25 जागा मिळू शकतात. आपला तीन जागा मिळू शकतात तर त्या अन्य 1 ते 5 असे एक्झिट पोलच्या सर्वे मध्ये दिसून आले आहे.

Himachal Pradesh Election 2022 : सकाळी आठ वाजता मोतमोजणी सुरू

आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. त्यानंतर लवकरच निकालांचे अपडेट्स यायला सुरुवात होईल. निकालांचे लाइव्ह अपडेट्स वाचण्यासाठी वाचत राहा पुढारी….

हे ही वाचा :

Donald Trump : करचोरी प्रकरणी ट्रम्प यांची कंपनी दोषी

नवी दिल्ली : ‘गदारोळामुळे युवा खासदारांना काहीही शिकण्यास मिळत नाही’

Back to top button