Donald Trump : करचोरी प्रकरणी ट्रम्प यांची कंपनी दोषी

Donald Trump : करचोरी प्रकरणी ट्रम्प यांची कंपनी दोषी
Published on
Updated on

 वॉशिंग्टनः वृत्तसंस्था : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अब्जावधी रुपये कमाई करून देणार्‍या त्यांच्या रिअल इस्टेट कंपनी द ट्रम्प ऑर्गनायझेशनला कर चोरीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. सुमारे एक महिना चाललेल्या या सुनावणीदरम्यान ज्युरींनी कंपनीला 17 प्रकरणात दोषी ठरवले आहे. मॅनहॅटन कोर्टाने ट्रम्प यांच्या कंपनीवर करचोरीसह अनेक प्रकरणात दोषी ठरवले आहे.

कंपनीकडून अधिकार्‍यांना दिलेले आलिशान अपार्टमेंट, मर्सिडिज बेंझ आणि ख्रिसमससाठी एक्सट्रा पैशासाठी करचोरी केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने कंपनीवर भ—ष्टाचाराचेही आरोप लावले आहेत. हा खटला खोटे बोलणे, फसवणूक करणे आणि अनेक लोकांना आणि कंपनीला करचोरी करण्यास मदत करणारा होता, असे न्यायालयाने नमूद केले आहे. दरम्यान न्यायालयाच्या या निकालावर कंपनीने टिका केली असून कर्मचार्‍यांनी आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कंपनीचा वापर केला असून त्यासाठी कंपनीला दोषी ठरवणे चुकीचे असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news