Colorful clothes & Environment : भविष्यात पाणी हवे असेल तर रंगीत कपडे घालणे टाळा, वाचा रंगीत कपड्यांचे घातक परिणाम… | पुढारी

Colorful clothes & Environment : भविष्यात पाणी हवे असेल तर रंगीत कपडे घालणे टाळा, वाचा रंगीत कपड्यांचे घातक परिणाम...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल ढासळताना दिसत आहे. पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. या समस्यांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम मानवी जीवनावर होत आहे. पण सारासार विचार करता आपल्या लक्षात येईल की, मानवाचा पर्यावरणाचा अविवेकी वापर कारणीभूत ठरत आहेत. आपण जी कृती करतो. ती निसर्गाला किती अपायकारक आहे हे आपण पाहतो का हेही महत्त्वाचं. आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. त्यानिमित्ताने आपण घालत असलेले रंगबिरंगी कपडे पर्यावरणाचा (Colorful clothes & Environment) समतोल बिघडण्यास किती घातक ठरत आहेत हे पाहणार आहोत.

Colorful clothes & Environment : रंगीत कपडे जलप्रदूषणासाठी कारणीभूत

लाल, गुलाबी, व्हायलेट, ब्राऊन, डार्क ब्राईट कितीतरी रंगांचे कपडे… आकर्षक रंगसंगतीचे कपडे आपले मन मोहून टाकतात. मात्र, हेच रंग पाण्यासाठी घातक ठरत आहेत, असे म्हटले तर… अलीकडील संशोधनानुसार कपड्यांना रंग देणे हे पाण्यासाठी कशाप्रकारे मारक ठरत आहेत, हे समोर आले आहे. फॅशन उद्योग क्षेत्रात दरवर्षी सुमारे 93 अब्ज घन मीटर (21 ट्रिलियन गॅलन) पाणी वापरलं जातं. कपडे तयार करत असताना फिनिशिंगसोबतच, रंग देणे ही सर्वात प्रदूषक आणि जास्त कष्ट लागणारी प्रक्रिया असते. फिनिशिंगमध्ये फॅब्रिकला हवा असा लूक किंवा फील देण्यासाठी केमिकल वापरले जाते. कपड्यांना ब्लीचिंग करणे, मऊ करणे किंवा कपड्याला वॉटरप्रूफ किंवा सुरकुत्याविरहीत बनवणे यासाठी केमिकलचा वापर केला जातो. कपड्यांचा रंग जाऊ नये म्हणून तेव्हा कलर करताना मोठ्या प्रमाणात पाणी आणि रसायने वापरली जातात.

जीन्सबद्दल हे माहित आहे का? 

युनायटेड नेशन्सच्या म्हणण्यानुसार, कापूस पिकवण्यापासून ते तयार उत्पादनापर्यंत जीन्सची एक जोडी तयार करण्यासाठी अंदाजे 7,500 लिटर पाणी वापरलं जातं. जीन्सला निळा रंग देण्यासाठी जीन्सला फॅब्रिक सिंथेटिक इंडिगो डाईच्या मोठ्या व्हॅट्समध्ये वारंवार बुडविले जाते. डाईंग केल्यानंतर प्रक्रिया केली जाते. आणि मऊ टेक्सचर आणण्यासाठी रसायनांनी धुतले जाते. फिकट किंवा वॉर्न ईन दिसण्यासाठी आणखी रासायनिक प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्यामध्ये अॅसिड, एन्झाईम, ब्लीच आणि फॉर्मल्डिहाइड वापरले जाते.

फॅशन उद्योग आणि पर्यावरण 

प्रत्येक हंगामात फॅशन उद्योगात वेगवेगळ्या फॅशन येत असतात. विविध प्रयोग कपंड्यांवर केले जातात. कपड्यांच्या डिझाईनपासून ते कपड्यांना रंग हायलाइट केले जातात. नवीन रंग हायलाइट करण्यासाठी अधिक, नवीन प्रकारची रसायने, रंगद्रव्ये आणि उत्प्रेरकांचा वापर केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निरुपयोगी, रसायनांनी भरलेले सांडपाणी बाहेर काढण्याचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणजे ते पाणी जवळच्या नद्या आणि तलावांमध्ये टाकलं जातं. त्यातील काही रसायने खूपच घातक असतात. जी जलप्रदूषणासाठी कारणीभूत ठरतात. सर्व रसायने आणि सॉल्व्हेंट्स घातक नसतात, तरीही जागतिक बँकेने 72 विषारी पदार्थ ओळखले आहेत जे केवळ कापड रंगामुळे उद्भवतात. हे सांडपाणी जलमार्गात ते अशा ठिकाणी साचतात जिथे प्रकाश येऊ शकत नाही. त्यामुळे वनस्पतींची प्रकाशसंश्लेषण करण्याची क्षमता कमी होते. पाण्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. त्यामुळेच जलचर वनस्पती आणि प्राणी मरतात.

Colorful clothes & Environment :विविध आजारांना आमंत्रण

सांडपाणी पाण्यात जोडले जाते. याचा परिणाम तेथील जीवसृष्टीवर होत असतो. जलचर वनस्पती आणि प्राण्यांच्या शरीरात रसायने तयार होऊ शकतात, ज्यामुळे विविध कर्करोग, तीव्र आजार आणि त्वचेच्या समस्यांचा धोका वाढतो. याचा परिणाम अन्न साखळीवर होत असतो. केमिकलयुक्त पाण्याचा वापर पिकांना सिंचन करण्यासाठी देखील केला जातो. अभ्यासात असे दिसून आले आहे की त्या शेतीतून उगवलेल्या भाज्या आणि फळांमध्ये कापडाचे रंग दिसत आहेत.

हेही वाचा 

Back to top button