बिग बॉस मराठी सिझन चौथा: घरात इतिहासात पहिल्यांदाच होणार चार वाईल्ड एन्ट्री ! | पुढारी

बिग बॉस मराठी सिझन चौथा: घरात इतिहासात पहिल्यांदाच होणार चार वाईल्ड एन्ट्री !

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉसच्या घरात इतिहासात पहिल्यांदाच होणार आहेत चार वाईल्ड एन्ट्री. आता हे चार सदस्य कोण असतील? ते घरात कधी एन्ट्री घेतील ? याची चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु आहे “युद्ध कॅप्टन्सीचे” हा कॅप्टन्सी टास्क. आणि त्यासाठीच सदस्य आखात आहेत स्ट्रॅटेजी. टास्कमध्ये कसे समोरच्या टीमला हरवता येईल? हे सदस्याच्या डोक्यात आहे. एकिकडे प्रसाद, तेजस्विनी आणि अमृता देशमुख तर दुसरीकडे समृद्धी, अक्षय आणि रोहित आहेत. यामध्ये अक्षयचे म्हणणे आहे की, ते अटॅक नाहीच करणार. कारण त्यांच्याकडे शून्य आहे. आता कोण जिंकणार कॅप्टन्सी टास्क ? कोण बनणार कॅप्टन हे पुढील भागात समजेल.

संबंधित बातम्या

काल अपूर्वा कॅप्टन्सी कार्यातून बाद झाली. रोहित आणि तेजस्विनी या आठवड्यातील कॅप्टन पदाचे उमेदवार ठरले. तर, बिग बॉस यांनी वारंवार ताकीद देऊन देखील सदस्य उत्साहाच्या भरात आक्रमक होत आहेत. आक्रमकतेवर नियंत्रण न ठेवल्यामुळे विकास आणि रोहित बिग बॉसच्या दंडास पात्र ठरले. बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत त्यांना जेलमध्ये राहण्यास सांगितले. यामुळे चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button