Rinku Rajguru : आर्ची थेट काळजात घुसली 💕...(Video) | पुढारी

Rinku Rajguru : आर्ची थेट काळजात घुसली 💕...(Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या ‘सैराट’ चित्रपटात मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) तिच्या अभिनयाची छाप पाडल्यानंतर ती पुन्हा एकदा आगामी ‘छुमंतर’ चित्रपट घेऊन येत आहे. रिंकूची ‘सैराट’ चित्रपटांताल आर्चीची भूमिका आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. सैराटनंतर रिंकू ‘कागर’, ‘मेकअप’ आणि ‘आठवा रंग प्रेमाचा’ यासारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारल्या. रिंकू सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते. सध्या आर्ची म्हणजे, रिंकूच्या एका व्हिडिओने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर पर्पल रंगाचा टॉप आणि पीच रंगाचा स्कर्टमधील फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिच्या पर्पल रंगाचा टॉपने चारचॉंद लावले आहेत. यावेळी रिंकूने फॅशन करताना दोन वेगवेगळे रंग निवडले असून यात तिचा प्रिंटेट स्कर्टदेखील आकर्षक दिसत होता. रिंकूच्या अनोख्या फॅशनने चाहत्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने जांभळ्या आणि रेड रंगाचे दोन इमोजी शेअर केली आहेत. या फोटोला तिने सोफ्यावर बसून, उभारून आणि गालावर हात ठेवत हटके पोझ दिली आहे. केसांची स्टाईल, गालावर केसांची बट, लिपस्टिक आणि इअररिंग्सने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.

रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्याची लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात एका युजर्सने ‘Agaaa agaaa ❤️❤️’, ‘Osm🔥’, ‘Looking so beautiful 👌😍😍’, ‘मराठी दिपीका 😍’, ‘Super super super super very nice beautiful looking 😍🎥⭐😍’, ‘Beautiful’, ‘wow kay disali rinku diiii❤️❤️’, ‘stunning look❤️😍’, ‘Oh my my..!!, Hotiii🔥’, ‘Kdk❤️🔥’, ‘बहुत ही शानदार तस्वीर’, ‘😍 Love Forever ❤️’, ‘Lovely 😍😍’, ‘थेट काळजात घुसली तु 💕💕😍’, ‘Wow❤️’, ‘Kiti sundar aani cute disteys 😍❤️’, ‘Wow awesome katil 😍😍’, ‘Awsmm🔥’, ‘सुंदर ताई ❤️’, ‘जितनी तारीफ आपकी कम है’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत ४० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे. रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ती लवकरच ‘छुमंतर’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. रिंकूसोबत या चित्रपटात अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि रिषी सक्सेना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले आहे. याशिवाय रिकू सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button