Aindrila Sharma : अभिनेत्री बंगाली एंड्रिला शर्मा हिचे निधन | पुढारी

Aindrila Sharma : अभिनेत्री बंगाली एंड्रिला शर्मा हिचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे (Aindrila Sharma) ब्रेन स्ट्रोकमुळे निधन झाले आहे. तिने वयाच्या २४ व्या वर्षी कोलकाता येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. एंड्रिलाच्या निधनाने बंगाली, बॉलिवूडसह अनेक कलाकारांमध्ये शोककळा पसरली आहे.

अभिनेत्री एंड्रिला शर्माची (Aindrila Sharm ) गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चिंताजनक होती. एंड्रिला १५ नोव्हेंबर रोजी अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्या. यानंतर त्यां कोमात गेल्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवले होते. याआधी १ नोव्हेंबर रोजी तिला हद्यविकाराचा झटका आल्यानंतर तिची प्रकृती ढासळली होती. या आजारातून ती लवकर बरी होण्यासाठी कुटूंबियानी खूपच पैसा खर्च केला होता. मात्र, आज त्याची कोलकाता येथील रुग्णालयात प्राणजोत मावळली. एंड्रिलाच्या निधनाने चाहत्यांसह सर्व स्टार्संना धक्का बसला आहे.

एंड्रिला शर्माने अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. तिने २००७ मध्ये ‘झूमर’ या टीव्ही शोमधून पहिल्यादा पदार्पण केले आहे. यानंतर तिने ‘जीवन ज्योती’, ‘जिओं काठी’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसली. तर एंड्रिलाचे सोशल मीडियावर खूपच फॅन-फॉलोव्हर्स आहेत. एंड्रिला सोशल मीडियावर सक्रिय असून तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो पाहायला मिळतात.

हेही वाचलंत का?

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

 

View this post on Instagram

 

A post shared by Aindrila Sharma (@aindrila.sharma)

Back to top button