Yashashree Masurkar : 'बिग बॉस'च्या घरातून यशश्री मसुरकरची एक्झिट; आता उत्सुकता दुस-या बाहेर पडणा-या सदस्याची? | पुढारी

Yashashree Masurkar : 'बिग बॉस'च्या घरातून यशश्री मसुरकरची एक्झिट; आता उत्सुकता दुस-या बाहेर पडणा-या सदस्याची?

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय होत चालला आहे. या शोमध्ये गेल्या काही दिवसांपासून नवनवीन ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. या मनोरंजक शोमध्ये आता एका वेगळ्या वळणावर पोहोचली असून यातील दोन सदस्यांची एक्झिट (आऊट) होणार आहेत. तर या शोमधून अभिनेत्री यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar) ही घरातून बाहेर पडणारी पहिली सदस्य ठरली आहे. तर दुसरा कोणता सदस्य घरातून बाहेर पडणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

या आठवड्यात यशश्री मसुरकर (Yashashree Masurkar) , किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी हे सदस्य डेंजर झोनमध्ये असल्याने यातून कोणाची तरी एक्झिट होणार होती. याच दरम्यान बिग बॉस घरातून यशश्रीला बाहेर पडावे लागले. यामुळे या शोमध्ये अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या आहेत. आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी आणखी एकाची एक्झिट होणार आहे. परंतु, याची माहिती बिग बॉसच्या पुढच्या भागात मिळणार आहे. यामुळे बिग बॉसमधून बाहेर पडणारी पहिली सदस्य यशश्री मसुरकर असून दुसरा कोणाचा नंबर लागतो यासाठी चाहत्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉसच्या घरातून यशश्री बाहेर पडल्यानंतर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांचे आभार मानले आहे. यात तिने लिहिले आहे की,’तुमच्या सहकार्याबद्दल आभार… खूप-खूप प्रेम’. यशश्री बाहेर पडल्याने चाहते मात्र, नाराज झाले आहेत. यशश्रीच्या पोस्टवर सर्वोत्कृष्ट स्पर्धक, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, छान खेळलीस यासारख्या अनेक कॉमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. एक्झिटनंतर यशश्री बिग बॉस घरातील एकाही सदस्याला न भेटला बाहेर पडली आहे. यशश्री मसुरकर सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. ‘टुकटूक राणी’ म्हणून तिला ओळखले जाते. यशश्री अभिनेत्रीसोबत मॉडेलदेखील आहे. तिने हिंदी मालिकांमध्ये अधिक काम केलं आहे.

हेही वाचलंत का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Tuktukrani (@yashashri.masurkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tuktukrani (@yashashri.masurkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tuktukrani (@yashashri.masurkar)

Back to top button